आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यातून केस खाण्याचा आजार; 14 वर्षांच्या मुलीच्‍या पोटातून काढला गोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नैराश्याच्या गर्तेत अडकल्यामुळे 14 वर्षीय मुलीला डोक्याचे केस खाण्याची सवय जडली. हळूहळू पोटात केसांचा गोळा तयार झाला आणि तिची पोटदुखी सुरू झाली. तिची ही सवय जीवावर बेतणारी होती. मात्र, जळगावातील डॉ. नंदिनी पाटील यांनी दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून दीड किलो वजनाचा केसांचा गोळा काढला.
जळगावातील रहिवासी सुनीता (नाव बदललेले) हिला सहा महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होता. 15 दिवसांपूर्वी प्रचंड त्रास वाढल्याने तिला गायत्री हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जन डॉ. नंदिनी अनिल पाटील यांच्याकडे दाखल केले. सोनोग्राफीतूनही त्रासाचे कारण स्पष्ट होत नसल्याने सिटी स्कॅन करण्यात आले. तसेच तोंडातून दुर्बिण टाकून आजाराचे निदान करण्यात आले. यावरून सुनीता या मुलीला ट्रायकोबझार नावाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले.

ट्रायकोटिलोमेनियाचे प्रमाण देशात अधिक
हा मानसिक आजार आहे. ट्रायकोटिलोमेनिया असून डोक्यावरचे केस उपटून काढावे, अशी प्रत्येकवेळी रुग्णाची भावना असते. केस उपटल्यानंतर त्यांची बेचैनी कमी होऊन ते खायला लागतात. अशा रुग्णांमध्ये नैराश्य जास्त असते. औषधोपचार व समुपदेशनाद्वारे उपचार करता येतो. पाश्चात्य देशात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. डॉ. मयूर मुठे, मानसोपचारतज्ज्ञ
काय आहे हा आजार
या आजारात व्यक्ती आपल्याच डोक्याचे केस तसेच कपड्यांचा दोरा अशा गोष्टी तोडून खात असते. यामुळे हे केस व दोरा थेट जठरात जमा होतात. त्याठिकाणी अन्न व अँसिडमुळे केसांचा मोठा घट्ट गोळा तयार होऊन हळूहळू संपूर्ण छोटे आतडे व्यापले जाते.

वजन कमी होते
यात रुग्णाच्या पोटात प्रचंड दुखते, भूक कमी होते, कारणाशिवाय वजन कमी होणे अशी लक्षणे दिसायला लागतात. अशा आजाराची व्यक्ती शांत असतात. परंतु त्यांची कृती सुरूच असते. वयाच्या 18 वर्षापर्यंत अशी लक्षणे दिसतात मात्र त्यानंतर सवय मोडते.

18 वर्षांत ही दुसरी शस्त्रक्रिया
4माझ्या 18 वर्षांच्या कार्यकाळात ही दुसरी दुर्मिळ शस्त्रक्रिया पाहिली. पालकांनी आपल्या मुली एकलकोंड्या तर होत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लॅप्रोस्कोपीने ही शस्त्रक्रिया करता येते. परंतु या आजारात ओपन सर्जरीशिवाय पर्याय नाही. हा आजार टिनएर्जसमध्ये असतो. आठवडाभरापूर्वीच शस्त्रक्रिया केली. डॉ. नंदिनी पाटील, जनरल व लॅप्रोस्कोपी सर्जन