आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stopped Promoting Grampanchyat Elections, Vote Tomorrow

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रचार थांबला; उद्या मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या ७०३ सार्वत्रिक ५४ पोटनिवडणुकींसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला अाहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या असून आता मोबाइल, व्हॉट्सअॅप आदी छुप्या पद्धतीने दोन दिवस प्रचार सुरू राहणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येईल. निवडणुकीसाठी संबंधित क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रविवारी थंडावली आहे. सात हजारांवर उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी होणाऱ्या मतदानावर ठरणार आहे. दरम्यान, खुला प्रचार बंद झाला असला तरी सोमवारचा दिवस इच्छुकांना मिळणार असल्याने प्रत्यक्ष भेटून अथवा फोन, मोबाइलवर उमेदवारांकडून मतदारांची मनधरणी सुरू राहणार आहे. यासह घरोघरी मतदानासाठी लक्ष्मीदर्शनही देण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून होण्याची शक्यता आहे. प्रचार थंडावल्यानंतरचा हा दिवस प्रभागात कलाटणी देणारा ठरत असल्याने यादिवशी अनेक उलाढाली होत असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, सर्व तालुकास्तरांवरून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे ठिकाण दिले जाणार आहे. मतदान केंद्रांवर जाण्यासाठी खासगी वाहनांसह सरकारी वाहनांचा वापर केला जाणार आहे. यासाठी स्कूलबस, जीप आदी वाहनेही घेण्यात आली आहेत. मतदानाच्या िदवशी ईव्हीएम मशीन बंद पडण्यासह काही अडथळे निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे पथक मतदानाच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. मतदानानंतर मतपेट्या या सर्व तहसील कार्यालयात जमा करण्यात येणार अाहेत. त्यानंतर गुरुवारी ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

असे होईल मतदान
तालुकाग्रा.पं.ची एकूण
संख्या जागा जळगाव४० ३८९
जामनेर ६८ ५०१
एरंडोल ३४ २६६
धरणगाव ४१ २८५
भुसावळ २१ २३१
मुक्ताईनगर ४७ ३२५
यावल ४७ ६५९
रावेर ४१ २६४
बोदवड २९ २०२
पाचोरा ८५ ६७५
भडगाव २८ २०५
चाळीसगाव ६९ ५६२
अमळनेर ५९ ३५५
पारोळा ५३ ४६७
चोपडा ४३ ४०१
एकूणजागा पोटनिवडणूक - ५४
कर्मचारी यंत्रणा
एकूणतालुके - १५
मतदान केंद्रांची संख्या - ३१७७
मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी, शिपाई, पर्यवेक्षक - १५८८५
एकूण बॅलेट युनिट - ३४९८
एकूण कंट्रोल युनिट - ३४९८
पांढऱ्या रंगाच्या मेमरी - ३४९८
पॉवर बँक बॅटरी - ३४९८
पोलिस कर्मचारी - ३२००