आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stopping The Professors Salary : Higher Education Co Director Orderd To The Principals

प्राध्यापकांचे पगार थांबवा : उच्चशिक्षण सहसंचालकांचे प्राचार्यांना आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - परीक्षा काळात कामावर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांचे पगार थांबवा, असे आदेश शुक्रवारी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. ए.बी.साळी यांनी काढले. त्या संदर्भातील पत्र त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील प्राचार्यांना शुक्रवारीच पाठविले आहे.

विद्यापीठांतर्गत ज्या महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या प्रात्यक्षिक किंवा लेखी परीक्षेत प्राध्यापकांनी बहिष्कार टाकून कामात सहभाग घेतला नसेल असे प्राध्यापक त्या दिवशी महाविद्यालयात हजर असले तरी त्यांना त्या दिवसाचे वेतन दिले जाणार नाही. प्राचार्यांनी संबंधित प्राध्यापकांचे वेतन देयक पाठविताना तशी नोंद घेऊन सहसंचालक कार्यालयास पाठवावी. संपकरी प्राध्यापकांना दोन दिवसांत दोन झटके मिळाले आहेत.