आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी अनवाणी सराव; बूट घेण्यासाठी पैसेच नव्हते, आमदार सरसावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- ‘आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी अनवाणी सराव, बुट घेण्यासाठी पैसेच नाहीत’ या मथड्याखाली 'दिव्य मराठी'ने भालोद, ता. यावल (जळगाव) येथील सुरज मनोज भालेराव (वय-22) या तरूणाची व्यथा मांडली होती. 3 डिसेंबर रोजी तो पुण्यात होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याच्या पायात बुट नाही, हे वृत्त वाचल्यावर आमदार हरिभाऊ जावळेंसह अनेकांनी त्यांच्या मदतीला सरसावले आहे.

 

मुंबई येथे दिनांक 26 नोव्हेंबरला पवई आयआयटीची ‘मूड इंडिगो हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा अनवाणी धावत जिकंत ‘जळगावचा मिल्खा’ म्हणून आपली छाप सुरज भालेरावने सोडली. मात्र, त्याच्या पायांना बुट लाभले नाही. तेव्हा पुढील स्पर्धा देखील अनवाणी पायानेचे खेळावी लागणार काय ? असा प्रश्न 'दिव्य मराठी'ने त्याच्या परिस्थितीजन्य वास्तवतेनुसार मांडला होता. त्याची दखल घेत आमदार हरिभाऊ जावळे त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. हरिभाऊंचे चिरंजिव अमोल जावळे यांनी पुण्यातील स्पर्धेसाठी आलेल्या सुरज भालेराव याला बूट गिफ्ट केले. विशेष म्हणजे सुरज हा स्पर्धेसाठी शुक्रवारी सकाळीच पुण्याला रवाना झाला होता. अमोल जावळे यांनी त्यास पुण्यालाच एका मित्राच्या माध्यमातून त्यास बुट घेवुन दिला आहे. सोबतच स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

पुण्याच्या स्पर्धेनंतर 12 ते 16 डिसेंबरदरम्यान आंध्रप्रदेशात होणार्‍या 21 किमीच्या ‘ऑल इंडीया युनिव्हर्सिटी’ क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी सुरज भालेरावची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवड झाली आहे. येथे तो उमविचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

 

मदतीसाठी हेही सरसावले
यावलचे नगरसेवक अतुल पाटील, डॉ. कुंदन फेगडे, जळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.गोविंद मंत्री, सद्या सिगांपुर येथे असलेेले किनगाव येथील किरण दगडू पाटील, भुमि अभिलेख व महसुल कर्मचाऱ्यांचा ‘हितगुज’ व्हाटसअॅप गृप अॅडमिन जळगाव भुकरमापक संदिप हिरोळे, डॉ. जाकीर हूसेन उर्दु कॉलेज यावलचे प्रा. रहिम रजा.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. सुरजसह त्यांच्या मित्रपरिवार आणि शिक्षकांनी मानले दिव्य मराठीचे आभार...

बातम्या आणखी आहेत...