आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द करा दुनिया बदला: अपंगत्वावर मात, वडिलांचे स्वप्न साकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - अमळनेर येथील नितेश चंदनमल कटारिया ११ महिन्यांचे असतानाच पोलिओने अपंगत्व आले. मात्र, वडिलांनी पाहिलेले चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न त्यांनी मोठेपणी चिकाटीच्या बळावर साकारले. नितेश यांच्या पत्नी विनितादेखील अपंग असून उच्चशिक्षित आहेत. एम. कॉमनंतर नितेश यांनी औरंगाबाद, नाशिक, जळगाव येथे सीएच्या परीक्षा दिल्या. २०१३ मध्ये ते यात उत्तीर्ण झाले. फक्त जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नितेश सीए तर झालेच, शिवाय या आता त्यांनी चांगले नावही कमावले आहे.

परीक्षेच्या वेळी विनिता यांच्याशी ओळख
सीएची परीक्षा देण्यासाठी नितेश नाशिकला गेले तेव्हा काठ्यांच्या आधाराने विनिता पुखराज जैन परीक्षा आल्या होत्या. पूर्णत: अपंग असूनही त्यांची चिकाटी पाहून नितेश भारावले. पुढे मैत्री झाली. ३१ डिसेंबर २०१५ रोजी दोघांचा विवाह झाला.

>पोलिओग्रस्त विनिता बी.कॉम एल.एल.बी. सीएससी ( कंपनी सेक्रेटरी) असून नाशिक येथे त्या सीए, सीएस, आयसीडब्ल्यूएचे क्लासेस घेत.
>याशिवाय महिला, विद्यार्थी, सकारात्मक विचार या विषयांवर समुपदेशनही करतात.
>विनिता स्वत: दुचाकी व कार चालवतात. तर नितेश फक्त दुचाकी चालवू शकतात.
बातम्या आणखी आहेत...