आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाखोंचे दागिने परत करून घडविले प्रामाणिकतेचे दर्शन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पैशांसाठी स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याचे प्रकार ऐकायला मिळतात. प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत असल्याची स्थिती आहे. कमी श्रमात जास्त पैसे कसे मिळतील याचाच विचार प्रत्येक जण करतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीला सोन्याचे दागिने सापडले तर संबंधित व्यक्ती ते दागिने परत देईल यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही; पण येथील युनियन बॅँकेचे लिपीक म्हणून कार्यरत असलेले दिलीप जोगी यांनी तब्बल सहा लाखांचे दागिने परत करून प्रामाणिकपण अद्यापही जिवंत असल्याचे अनोखे उदाहरण र्शी. जोगी यांनी घालून दिले आहे.
‘अच्छे लोग, अच्छी बॅँक’ असे ब्रीदवाक्य असलेल्या गल्ली क्रमांक पाचमधील युनियन बॅँकेच्या शाखेत प्रकाश भावसार यांचे गेल्या 15 वर्षांपासून खाते आहे. ते गेल्या आठवड्यात बॅँकेत आपल्या मुलीसोबत बॅँकेत आले होते. बॅँकेत आल्यावर र्शी. भावसार यांनी लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी बॅँकेची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली; परंतु घाईघाईने त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी लॉकर रूममध्येच राहून गेली. त्या वेळी हा प्रकार त्यांचा लक्षात आला नाही. काही वेळेनंतर बॅँकेचे दिलीप जोगी हे कामानिमित्त लॉकर रूममध्ये गेले असता त्यांना पिशवी आढळून आली. उत्सुकतेपोटी त्यांनी पिशवी उघडून पाहिली. त्यात सोन्याचे दागिने आढळल्याने त्यांनी तत्काळ शाखा प्रबंधक सुधीर पाटील यांना घटनेची माहिती देऊन सोन्याच्या दागिन्यांची पिशवी त्यांच्याकडे दिली. त्यानंतर बॅँकेत दिवसभर लॉकर ऑपरेट करण्यासाठी कोण-कोण आले होते, याचे रेकॉर्ड शाखा प्रबंधक सुधीर पाटील व सर्व कर्मचार्‍यांनी तपासले. त्यानुसार ही दागिन्यांची पिशवी प्रकाश भावसार यांची असल्याचे निष्पन्न झाले. खात्री केल्यानंतर सहा लाख रुपयांचे दागिने असलेली पिशवी प्रकाश भावसार यांच्या स्वाधीन करण्यात आली. याबद्दल प्रकाश भावसार यांनी शाखा प्रबंधक सुधीर पाटील, विशेषत: दिलीप जोगी यांचे आभार मानले. सर्वत्र अप्रामाणिकपणाचे दर्शन घडत असताना कुठेतरी प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे हे उदाहरण आहे. र्शी. जोगी यांचा प्रामाणिकपणा दिशा देणारा आहे. दरम्यान, ज्या दिवशी र्शी. जोगी यांनी सहा लाखांचे दागिने परत केले, त्याच दिवशी सायंकाळी त्यांना लिपिक पदाच्या बढतीची ऑर्डर मिळाली. त्यांची बॅँकेच्या दोंडाईचा शाखेत बदली झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बॅँकेत कार्यरत आहे. इतक्या वर्षांच्या सेवेत नेहमी प्रामाणिकपणे काम करण्यास प्राधान्य दिले. बॅँकेत रोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. लाखो रुपये रोज डोळय़ासमोर पडून असतात; परंतु कधीही वाईट विचार मनात येत नाही. बॅँकेच्या लॉकर रूममध्ये त्या दिवशी दागिने सापडल्यानंतर लगेच ते वरिष्ठ अधिकार्‍यांना परत केले. विशेष म्हणजे त्याच दिवशी सायंकाळी मला शिपाई पदावरून लिपिक पदावर बढती झाल्याची ऑर्डर मिळाली. हेच माझे बक्षीस आहे. दिलीप जोगी, लिपीक