आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाल्मीकनगरात तिघांचे कुत्र्याने तोडले लचके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात माेकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर हाेत अाहे. गेल्या आठवड्यात मोकाट कुत्र्यांनी १७ जणांना चावा घेतला होता. मंगळवारी दुपारी १२ वाजता आसोदा रस्त्यावरील वाल्मीकनगरमध्ये कुत्र्याने तिघांचे लचके ताेडल्याने ते जखमी झाले अाहे. त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केलेे अाहे.

जखमीमध्ये कुंदन वानखेडे (वय २५), चंद्रकांत सैंदाणे (वय २५, दाेघे वाल्मीकनगर), नीलेश पाटील (वय ३५, रा. भवानीपेठे) यांचा समावेश अाहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील माेकाट कुत्र्यांचा त्वरित बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत अाहे.