आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शहरातील पथदिवे चौथ्या दिवशीही बंद; भाजपने जमा केले 786 रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिका प्रशासनाने वीजबिलाची थकबाकी न भरल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित करण्यात आला. चौथ्या दिवशीही पथदिवे बंद होते. पालिकेचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे मंगळवारी शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पालिकेतील सत्ताधारी गटाचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्याकडे भीक मागून भाजपच्या नगरसेवकांनी अभिनव आंदोलन केले. यातून जमा झालेली 786 रुपयांची रक्कम प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली.

पालिकेने वीजबिल न भरल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहरातील प्रमुख मार्गांवर भीक मांगो आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ापासून आंदोलनास सुरुवात झाली. मॉर्डनरोड, स्टेशनरोडवरून कार्यकर्ते बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ पोहचले. पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे नगरसेवक राजेंद्र आवटे पोलिस ठाण्याबाहेर उभे असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर हातातील डबा पुढे करून भीक मागितली. अहिल्यादेवी कन्या विद्यालयासमोर या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. शहराध्यक्ष लक्ष्मण सोयंके, अनिल चौधरी, प्रवीण इखनकर, नगरसेवक प्रमोद नेमाडे, नामनिर्देशित सदस्य वसंत पाटील, परीक्षित बर्‍हाटे, रमण भोळे, दिनेश नेमाडे, अमोल इंगळे, नंदू बर्‍हाटे, मंगेश पाटील, राजू खरारे, अजय पाटील, रमेश नागराणी, पंडित रविओम शर्मा, कैलास शेलोडे, नगरसेवक राहुल मकासरे, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील उपस्थित होते.