आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर पट्टे मारल्यास कोंडी सुटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक मिळेल त्या जागेवर वाहने लावून माेकळे हाेतात. या बेशिस्त पािर्कंगमुळे माेठ्या प्रमाणात वाहतुकीची काेंडी हाेत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पट्टे मारल्यास ही समस्या काही अंशी सुटू शकते.
उद्यान,व्यावसायिक परिसरातही डोकेदुखी
नवीपेठ,सुभाष चौक, सराफ बाजार, शहरातील सर्वच प्रमुख सार्वजनिक उद्याने, खासगी पालिकेची व्यापारी संकुल या ठिकाणी येणारे नागरिक ग्राहकांना पार्किंगची सुिवधा नसल्याने रस्त्यात जागा मिळेल तेथे वाहने लावली जातात.
रुग्णालयांची पार्किंग गेली कुठे
वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात २०० हून अधिक माेठी रुग्णालये आहेत. नियमानुसार प्रत्येक १० बेडच्या रुग्णालयासाठी एक चारचाकी दोन दुचाकीसाठी पार्किंगची सुविधा असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात बहुतांश रुग्णालयांनी बांधकाम परवानगी मागताना रुग्णालये म्हणून परवानगी मागता रहिवास म्हणून परवानगी मागितल्याने पार्किंग इतर तांत्रिक मुद्यांमधून पळवाट काढली आहे. काहींनी पार्किंगसाठी सोडलेल्या जागांमध्ये मेडिकल स्टोअर्स किंवा वॉचमन रूम, स्टोअर रूम बांधून त्याचा वापर केला आहे.
बांधकाम नियमावलीत तरतुदी
रहिवास: प्रत्येक२५० चौरस मीटर (२६९०.९८ चौरस फूट ) जागेवरील बांधकामासाठी एक चारचाकी दोन दुचाकी पार्किंगची जागा असावी. दवाखाने वैद्यकीय अास्थापना : प्रत्येक१० बेडसाठी एक चारचाकी दोन दुचाकींसाठी पार्किंगची जागा असावी.

दुकाने: प्रत्येकी७५ चौरस मीटर (८०७ चौरस फूट ) बांधकामांसाठी एक चारचाकी दोन दुचाकीच्या पार्किंगची जागा असावी.
या रस्त्यांच्या दोन्ही कडेला पट्ट्यांची गरज-
कोर्ट चौक ते गणेश कॉलनी
शास्त्री टॉवर ते स्वातंत्र्य चौक
शास्त्री टॉवर ते भिलपुरा चौक
भगवती स्विट मार्ट ते गोलाणी हनुमान मंदिर
मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते