आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ टक्के वेतन दिल्यास महापालिकेत संप, अांदाेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेची कमकुवत अार्थिक स्थिती, त्यात अागामी काळात उत्पन्नात प्रचंड घट हाेण्याची शक्यता लक्षात घेता, कर्मचाऱ्यांचे ७५ टक्के वेतन कपातीचा निर्णय घेण्याची तयारी सुरू अाहे. याविराेधात कर्मचारी संघटनांनी दंड थाेपटले असून, अाधी वर्ग-१च्या अधिकाऱ्यांचे वेतन कपात करा. कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्यास पालिकेत संप रस्त्यावर उतरून अांदाेलन करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे.

महापालिकेची अार्थिक घडी विस्कळीत झाली असून, कर्जफेडीत पैसा जात अाहे. त्यात मार्चनंतर एप्रिल ते जूनपर्यंत मालमत्ता कराची वसुली अल्प राहणार अाहे. त्यामुळे केवळ शासनाकडून एलबीटीपाेटी मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार अाहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार करणे शक्य हाेणार नाही, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार थांबवता त्यांना केवळ २५ टक्के वेतन द्यावे, परिस्थिती सुधारल्यानंतर ७५ टक्के रक्कम अदा करावी, याबाबतच्या हालचाली प्रशासनात सुरू अाहे. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध हाेताच कर्मचाऱ्यांमध्ये असंताेषाचे वातावरण पसरले अाहे. कर्मचारी संघटनाही अाक्रमक झाल्या असून वारंवार कर्मचाऱ्यांच्या पगारावरच गदा अाणली जाते. मात्र, अधिकारी अापला पगार थांबवतील का? असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला अाहे. अधिकाऱ्यांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा पगार अत्यंत कमी असताे. त्यामुळे २५ टक्के रकमेतूनही त्यांचा संसार चालणार नसल्याचे अार्थिक गणित मांडले जात अाहे.

सफाई मजदूर संघाचा इशारा
अखिलभारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी अायुक्तांना निवेदन देऊन पगार कपातीच्या नियमबाह्य कामाला विराेध केला अाहे, असा काेणताही शासन अादेश नसून उलट ते तारखेच्या अात पगार करण्याचे निर्देश अाहेत. पालिकेची अार्थिक स्थिती ज्यांच्यामुळे खराब झाली, त्यांच्याकडून वसूल करावे. पालिका वसुलीसाठी सक्षम नाही का? असाही सवाल केला. पालिकेच्या या भूमिकेमुळे संघाने बैठकीचे अायाेजन केले अाहे.

प्रभाग समिती सभापतींनीही केला विराेध
प्रभाग समिती क्रमांक २च्या सभापती कंचन चेतन सनकत यांनीही पगार कपातीच्या भूमिकेचा विराेध केला अाहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तुलनेत अधिकाऱ्यांचे पगार चार पटीने जास्त असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना २५ टक्के वेतन दिले तरी त्यांना चालेल. परंतु, कर्मचाऱ्यांचा घरखर्चदेखील हाेणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अार्थिक संकट उभे राहणार अाहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या वेतनातून ७५ टक्के कपात करावी, अशी मागणी केली अाहे; अन्यथा अांदाेलनाचाही इशारा दिला अाहे.

कर्मचारी संप पुकारून पालिका बंद पाडणार
शहीदभगतसिंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी पगार कपातीचा निर्णय घेतल्यास कर्मचारी संप पुकारून पालिका बंद पाडण्याचा इशारा दिला. तास मान खाली घालून काम करणाऱ्या श्रमिकांचे पगार कपात करणे फालतू कामांसाठी खासगी कामांसाठी सरकारी वाहने वापरणे, पडदे अाडवे लावून चिरीमिरी करणारे अधिकारी पूर्ण पगार घेतील, हे सहन केले जाणार नसल्याचे पत्रकात म्हटले अाहे. कर्जापाेटी हप्ते भरणे बंद करा, नगरसेवकांकडून वसुली करा. तसेच कर्मचाऱ्यांना उपाशी मारण्याचे राक्षसी प्रयाेग करू नये, असेही पत्रकात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...