आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर बंद करा, बहुजन मुक्ती पार्टीची मागणीvvvvvv

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर बंद करावा, या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला.

भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकूंद सपकाळे, जिल्हा निरीक्षक शेख हमीद, महानगराध्यक्ष संजय सपकाळे, प्रा. विश्वास पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील यांनी निवडणूक आयोगाला ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात खेचून जनतेमध्ये जनजागृती करून जन आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी दिला. जिल्हा परिषद, टॉवर चौक, नेहरू पुतळा, शिवतीर्थ मैदानामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यासंदर्भात निवासी जिल्‍हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन दिले. या वेळी रेखा बोराडे, रत्ना सोनवणे, हारुन मन्सुरी, विनोद अडकमोल, सुनील पाटील, नईम सुलतानी , रियाज बागवान यांनी नियोजन केले.

भारत मुक्ती मोर्चा बहुजन मूक्ती पार्टीतर्फे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर बंद करावा या मागणीसाठी रेल्वे स्टेशनपासुन जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.