आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीपद्धतीने काढली चिठ्ठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बालकांच्यामोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत दुर्बल वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेशासाठी गुरुवारी चिठ्ठी काढून आकडेवारी निश्चित करण्यात आली. आठवडाभरात लॉटरी पद्धतीने ज्या पालकांच्या पाल्यांचा प्रवेश निश्चित होईल, त्या पालकांना मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे. या वेळी शहरातील सुमारे ५०० पालक पाल्यांसह उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रातील विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित अशा ३६ पात्र शाळांपैकी १५ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यामुळे १५ शाळांबाबत लॉटरी पद्धतीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही साेडत (लॉटरी) पुणे येथे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी)मार्फत होणार आहे. साेडतीसाठी ही आकडेवारी पुणे येथे कळवायची होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजता कन्या शाळेत आकडेवारी काढण्यात आली. उपायुक्त अविनाश गांगाेडे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, माध्यमिकचे शशिकांत हिंगाेणेकर, गटशिक्षणाधिकारी मनीष पवार, विस्तार अधिकारी सरला पाटील, मनपा प्रशासन अधिकारी वसंतराव महाजन आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचीयादी पुण्यातून येणार
शाळांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन आयडीवर पुणे येथून पाठवण्यात येणार आहे. मेसेज प्राप्त झाल्यानंतर पालकांनी त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून मूळ कागदपत्रे दाखवून आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे, असे प्रशासन अधिकारी वसंतराव महाजन यांनी सांगितले.

अशी घ्या माहिती
लॉटरीपद्धतीने प्रवेश नआणि्चित झाल्यानंतर पालकांना मोबाइलवर एसएमएस येईल. एसएमएस आल्यास पालकांनी आपल्या पाल्याचे अकाउंट rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटवर तयार केले आहे, ते login करून admit card या बटणावर click करावे. त्यावर पाल्याचे admit card particular शाळेसाठी दिसेल. मात्र, ही प्रक्रिया जवळपास आठ दविसांनी पूर्ण होईल.