आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यास मारहाण करणारी ला.ना.ची शिक्षिका निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील ला.ना. सार्वजनिक विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चप्पल काठीने अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला सोमवारी निलंबित करण्यात आले.

ला.ना.शाळेतील शिक्षिका जयश्री सूर्यवंशी यांनी ऑगस्ट रोजी सातवीचा विद्यार्थी वरुण चंद्रशेखर पाटील (रा.मुक्ताईनगर) याला मारहाण केली होती. तोंडावर चपलेने उजव्या डोळ्याजवळ काठीने मारल्यामुळे त्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली होती. तसेच संपूर्ण वर्गातील मुलांना पाऊण तास वर्गात कोंडून ठेवले होते. या प्रकरणानंतर वरुणच्या वडिलांनी मुख्याध्यापक जिल्हापेठ पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सोमवारी शालेय समितीची बैठक झाली. त्यात सूर्यवंशी यांना निलंबित करण्याचा निर्णय
घेण्यात आला. निलंबनाची लेखी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांना कळवण्यात आली आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या विरोधात यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या.

आज पोलिस चौकशी
वरुणच्यावडिलांनी जिल्हापेठ पोलिसांकडेही तक्रार केली असून, याप्रकरणी मंगळवारी चाैकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सूर्यवंशी यांना मंगळवारी पोलिसांनी बोलावले आहे.