आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Assaulted In Jalgaon University, Divya Marathi

जळगाव विद्यापीठातील विद्यार्थिनीचा विनयभंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक भवनात गैरप्रकारे रूम मिळवून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात
आली आहे.

अलाअप्देल रहिम मोहम्मद (३२, मूळ राहणार दुबई, ह.मु.औरंगाबाद) आणि परवीन वेसी बरगोनी (३८, मूळ रा.इराण, ह.मु. उमवि वसतिगृह) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. परवीन विद्यापीठात फिलॉसॉफीम पीएचडी करतो. उमवित एमएस्सी करणा-या एका विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आहे. जुलै महिन्यात पीडित मुलीने विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला होता. त्यानंतर मैत्रिणींसह गांधी टेकडी येथे फिरायला गेल्यानंतर परवीनने पीडितेच्या मोबाइलमध्ये त्यांचे फोटो काढून दिले होते. मोबाइल नादुरूस्त झाल्यामुळे फोटो दिसत नव्हते. तेंव्हा माझा मित्र अलाअप्देल येत असून तो मोबाइल दुरुस्त करून देईल, असे परवीनने पीडितेला सांगितले. त्यानुसार अलाअप्देलने पीडित मुलीचा मोबाइल दुरुस्त केला. यानंतर त्याने पीडितेशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला.