आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयातील २२ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणाने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी वाजता घडली. ही विद्यार्थिनी विद्यानगरात राहत असून, ती मूळची प्रवरानगर (अहमदनगर) येथील आहे.
मुंदडानगरात राहणा-या स्वप्निल खजिनदार केदार (वय २२) याने मैत्रीच्या उद्देशाने या विद्यार्थिनीशी संपर्क वाढवला. तसेच माेबाइलचा वापर करून त्याने मैत्रीसाठी तिला प्रपोज केले. मात्र, त्यास नकार दिल्यामुळे स्वप्निलने ितला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या फ्लॅटवर जाऊन तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तो तिला मुंदडानगरातील त्याच्या घरी घेऊन गेला तेथे रूममध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंिधत विद्यार्थिनीने रामानंदनगर पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल केदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.