आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: पालकच ठरवतील रिक्षाचालकांचे भविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षाचालकांचे भविष्य पूर्णपणे पालकांच्या हाती आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिक्षा बंद-चालूच्या प्रकरणावर या आठवड्यात पडदा पडणार आहे. पालकांशी चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष भरत वाघ आणि सचिव रवींद्र पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांची वाहतूक तूर्त सुरू राहणार आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागल्यास पालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पोटी पैसे वाढवून द्यावे लागणार आहे. यात पालकांनाही भुर्दण्ड बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी येणार्‍या आठवड्यात पालकांशी चर्चा करण्यात येणार आहे असेही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी कळविले आहे.

चर्चेअंती निर्णय
पालकांसोबत होणार्‍या बैठकीत पोलिस अधीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. सर्वांच्या समोर या विषयावर झालेल्या चर्चेअंती निघणारा निर्णय अंतिम राहील, असेही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

नीलेश पाटील यांची पत्रकबाजी
विद्यार्थी वाहतुकीचा विषय ऐरणीवर असताना राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष नीलेश पाटील यांनी पोलिस उपअधीक्षक बच्छाव यांची भेट घेतली असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. बच्छाव यांनी आठ विद्यार्थी वाहण्याचे तोंडी आश्वासन दिले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.