आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडलेली सोनसाखळी विद्यार्थ्याने केली परत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात दररोज महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याच्या घटना घडत असताना दादावाडीतील इयत्ता सातवीत शिकणार्‍या भावेश पाटील या विद्यार्थ्यांने मात्र शाळेत जाताना बस स्टॉपवर सापडलेली सोन्याची साखळी दुसर्‍या दिवशी परत केली. तो दादावाडी येथील आनंद कॉलनीत राहणारे चंद्रसिंग पाटील यांचा मुलगा आहे.

रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी भावेश हा 3 फेब्रुवारीला सकाळी शाळेत जाण्यासाठी दादावाडी बस स्टॉपवर उभा होता. तेथे त्याला 40 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी सापडली. जैन मंदिर परिसरात दररोज पहाटे फिरायला येणारे सेवानिवृत्त सैनिक प्रवीण पाटील हे पहाटे 5.30 वाजता बस स्टॉपजवळ व्यायाम करीत असताना त्यांची साखळी पडली होती. दरम्यान, दुसर्‍या दिवशी प्रवीण पाटील साखळी शोधत असल्याचे भावेशने पाहिले. त्याने तत्काळ तुमची साखळी माझ्याकडे असल्याचे सांगत साखळी परत केली.

प्रामाणिकपणाचे बक्षीस
भावेशने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून प्रवीण पाटील यांनी त्याला एक हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. ते देखील तो घेण्यास नकार देत होता. तेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी पुस्तके घेण्यासाठी त्याचा उपयोग कर, असे सांगितल्यावर त्याने ते स्वीकारले.