आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मूजे’, ‘बेंडाळे’त अकरावी प्रवेशासाठी हवे 85 टक्के; शहरातील 14 कॉलेजमध्ये अकरावीसाठी 6440 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दहावीच्या निकालाची टक्केवारी लक्षात घेता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेला गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळणार आहे. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचा मूजे आणि बेंडाळे महाविद्यालयाकडे अधिक कल दिसून येतो. गेल्या वर्षी मूजेत विज्ञान शाखेसाठी 86 टक्के तर बेंडाळे महाविद्यालयात 85 टक्के कटआॅफ होता.
जळगाव शहरातील 14 महाविद्यालयांमध्ये 6440 जागा आहेत. त्या तुलनेत 6 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी गुणवत्ता अधिकच वाढणार आहे. कला शाखेसाठी अद्याप गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाची अट नसून जो विद्यार्थी प्रथम येईल त्यास प्राधान्य असेल. त्यामुळे कला शाखेसाठी आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने लगेच अर्ज भरल्यास त्याला सहज प्रवेश मिळणार आहे.
शहरातील मूजे आणि डॉ. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षाप्रमाणेच गुणवत्ता यादीनुसार विज्ञान आणि वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.
गेल्या वर्षाचा असा होता कटआॅफ
मूजे महविद्यालय : विज्ञान- ओपन आणि ओबीसी-86.26, एस्सी-60.00,एसटी-60.00, व्हीजे-80.55, एन 1-69.82, एनटी2-69.20, एन3 - 77.00, एसबीसी - 81.06, वाणिज्य - ओपन आणि ओबीसी-74.00.

नंदिनीबाई, बेंडाळे महाविद्यालय : विज्ञान- ओपन 85.09, ओबीसी - 83.40, एस्सी- 72.80, व्हीजे-82.04, एनटी1-67.45, एनटी2-70.34, एनटी 3-76.06, एसबीसी-82.36. वाणिज्य - ओपन - 75.02, ओबीसी-70.80, एस्सी-64.60, एनटी 1 - 70.00, एनटी 2-62.40, एनटी 3-67.60, एसबीसी-72.80.
प्रक्रियेनुसार प्रवेश
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल त्यानुसार नियोजन होईल. अकरावीच्या प्रवेशाबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. नियोजित प्रक्रियेनुसारच प्रवेश होईल.
शशिकांत हिंगोणेकर,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

गुणवत्ता यादी लावणार
विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी गुणवत्ता यादी लावण्यात येईल. कला शाखेला मात्र, गुणवत्ता यादीचे निकष नाहीत. गुरुवारपासून प्रक्रियेला प्रारंभ होणार असून गेल्या वर्षाप्रमाणेच प्रक्रिया असेल.
राम प्रकाश, उपप्राचार्य, बेंडाळे महाविद्यालय
आज मिळणार गुणपत्रक
दहावीचा आॅनलाइन निकाल 17 जून रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी 3 वाजता शाळेमध्ये गुणपत्रक दिले जाणार आहेत. त्याच दिवसापासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 18 जुलैपर्यंत चालेल. खर्‍या अर्थाने महाविद्यालये गुरुवारपासून गर्दीने गजबजतील.