आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात बारावीच्या विद्यार्थ्याची घरी गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेला बाळा उर्फ अमित पवार याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी चितोडरोडवरील शिवशंकर कॉलनीत ही घटना घडली. अमित याची मंगळवारी दुपारी प्रात्यक्षिक परीक्षा होती. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज एकूण परिस्थितीवरून वर्तविण्यात आला आहे.
चितोडरोडवरील शिवशंकर कॉलनीत प्लॉट नं. ७-अ या ठिकाणी सेवानिवृत्त प्राध्यापक गंगाधर श्यामराव पवार हे राहतात. त्यांना दोन मुले आहेत. यापैकी बाळा उर्फ अमित (१७) हा सर्वात लहान आहे. याप्रकरणी गुलाब पवार यांच्या माहितीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक आशाबाई नाथजोगी यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.