आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरच्या मिलिटरी स्कुलमधील विद्यार्थ्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा- चोपडा नगरपालिकेच्या जलतरण तलावात एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमळनेर मिलिटरी स्कुलचा तो विद्यार्थी होता. कुंदन बहादूरसिंग वसावे (वय 15) असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
जलतरणाची परवानगी घेतली नव्हती
 उपजिल्हा रुग्णालयात दि. २१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिक्षक युवराज यशवंत पाटील यांनी कुंदनला दाखल केले. त्याला डॉ. सुरेश पाटील यांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांच्या माहितीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रदीप राजपूत हे करीत आहेत. दरम्यान शिक्षकांनी पोहण्याची परवानगी घेतलीच नव्हती आणि कोणतेही शुल्क भरले नव्हते, अशी माहिती मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिली आहे.