आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू, संतप्त जमवाने ट्रक जाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोदजवळ खड्डे चुकवताना सायकलस्वार विद्यार्थिनीचा ट्रकखाली चिरडून बळी गेला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने पशुखाद्याने भरलेला ट्रक पेटवून दिला. तसेच पोलिसांच्या वाहनासह नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाचीही तोडफोड केली. सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प होती.

जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या आमदार गिरीश महाजन यांनी रस्ता दुरुस्ती होईपर्यंत या महामार्गावरील नेरीजवळ असलेला टोलनाका बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारास दिला. सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील शीतल रामदास खंडारकर (वय 18) ही बारावीतील विद्यार्थिनी वाकोद येथील राणीदाणजी विद्यालयात शिकत होती. घरून सायकलवर विद्यालयात जात असताना वाकोद गावाजवळ ट्रकखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शीतलचा मृतदेह पाहून संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून देत रस्ता बंद केला. पोलिस घटनास्थळी उशीरा पोहोचल्याने त्यांच्यावरही दगडफेक केली. पोलिसांनीही लाठय़ा उगारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.