आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: उकाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील उकाई धरणातील किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची होडी पाण्यात उलटल्याने सहा जण पाण्यात पडले. या सहापैकी पाच तरुणांना पोहता येत असल्यामुळे ते पोहत सुरक्षित बाहेर आले. मात्र,त्यातील विश्वास चाैधरी या तरुणाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

उकाई धरणात असलेला पिलाजीराव गायकवाड संस्थानचा पाण्यात बुडालेला किल्ला पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याबाहेर आला अाहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी विश्वास रमेश चाैधरी (वय २३) हा मित्रांसह गेला होता. मात्र, त्यांची हाेडी पाण्यात बुडाली. इतर पाच जणांना पाेहता येत असल्याने ते किनाऱ्यावर पाेहोचले. परंतु विश्वास याला पाेहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ताे गांधीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत अाहे.

जुनाट होडीचा वापर : नवापूरहून२० किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या जामली गावात उकाई धरणात असलेला किल्ला पाहण्यासाठी जुनाट भंगार होडीचा वापर केला जात आहे. या होडीचे पाण्यात नियंत्रण व्यवस्थित हाेत नाही.
बातम्या आणखी आहेत...