आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Free From Bags : Education Through Internet

विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्यापासून मुक्ती : इंटरनेटद्वारे शिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शिक्षण जास्तीत जास्त प्रॅक्टिकल आणि गुणवत्तापूर्वक बनवण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इंटरनॅशनल प्रोग्राम लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्यापासून मुक्ती तर मिळेलच, परंतु दर्जेदार शिक्षण देण्याचा हेतूही साध्य होणार आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे शिक्षण जाईल. पहिल्या टप्प्यात चेन्नई, मुंबई, दिल्ली, चंदिगड यासारख्या देशातील 50 शहरांमध्ये ही योजना सुरू केली जाईल.

सीबीएसईने हा निर्णय एज्युकेशन पॅटर्न बदलण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्रेंड फॅकल्टीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण प्राप्त करू शकतील. या योजनेची सुरुवात पहिलीपासून होईल. त्यानंतर दरवर्षी एक वर्ग वाढत जाणार आहे.

शिक्षणात क्रांतिकारक बदल
सीबीएसईकडून नवीन बदल स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवणा-या आहेत. विद्यार्थ्यांना ख-या अर्थाने ग्लोबल बनवण्यासाठी आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतर ज्ञान मिळवण्यासाठी इंटरनॅशनल प्रोग्राम अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या शहरांपुरता असला तरी वर्षभरात तो छोट्या शहरांतही येईल. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असेल. भविष्यात सर्व शाळांसाठी हा निर्णय सक्तीचा असेल, अशी प्रतिक्रिया जळगावातील ओरियन इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी दिली.

फायदे काय ?
* विद्यार्थी क्वालिटी एज्युकेशनमुळे प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवू शकतील.
* ऑडिओ-व्हिज्युअल मीडियममुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होईल.
* इंटरनेटवर अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने ते कुठेही वाचन करू शकतील.
* रोज सकाळी उठल्यानंतर टाइम टेबलनुसार दप्तर काढण्याचा त्रास वाचेल.
* एका वर्गात केवळ 20 विद्यार्थी असल्याने शिक्षकांनाही शिकवणे सोपे जाईल.
वर्गात वीसच विद्यार्थी
नव्या पद्धतीनुसार शिक्षक पुस्तकातून नव्हे, तर ऑडिओ व्हिज्युअल सॉप्टवेअर व इंटरनेटचा वापर करून शिकवतील. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. अभ्यासक्रमात समाविष्ट धडे, महत्त्वाचे मुद्दे ई-कॉपीच्या माध्यमातून शिकवले जातील. जे विद्यार्थी वर्गात येऊ शकणार नाहीत ते घरी ऑनलाइन मागवून अभ्यास करू शकतील. एका वर्गात शिक्षक, विद्यार्थ्यांचे प्रमाण 20:1 असे असेल.
काय आहे योजना
इंटरनॅशनल प्रोग्राम ही संकल्पना परदेशी शिक्षणाच्या धर्तीवर आहे. त्यांना फॉरेन मोड ऑफ टीचिंगद्वारे शिकवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी गेले तरी त्यांना वेगळे वाटणार नाही.