आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Fuel And Girl Savings Message In Picture

चित्रातून इंधन बचत अन‌् भ्रूणहत्या राेखण्याचा संदेश, कागदावर चितारल्या कल्पना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; भारत पेट्रोलियमतर्फे शनिवारी चित्रकला स्पर्धा झाली. त्यात विद्यार्थिनींनी गाड्यांचा वापर कमी करून सायकलींचा वापर करा, तसेच इंधनाची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास सुचवले. तर स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी स्त्री जन्मांचा उत्सव रंगला, त्यापुढे जाऊन मुलींनी शिकून कुटुंबाची प्रगती झाल्याचे चित्रदेखील रंगवले. गणपतीच्या मिरवणुकीत गुलालाएेवजी फुलांची उधळण केली. एकापेक्षा एक सरस कल्पना कागदावर चितारल्या.
शहरातील सागरपार्क समोरील चौबे पेट्रोल पंपातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील महापालिकेच्या चौबे शाळेतील आठवी ते दहावीच्या २५ विद्यार्थिनींनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन चित्रे काढली. या स्पर्धेचे परीक्षण कुमावत यांनी केले. या वेळी प्रकाश चौबे, सागर चौबे, विवेक आळवणी आदी उपस्थित होते. चित्रकलेच्या शिक्षिका सुनीता भोळे, शोभा साळुंखे यांनी सहकार्य केले.

...असे होते चित्रकलेचे विषय
‘बेटीबचाओ, बेटी पढाओ’, पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखाल, इंधन बचत करा, गणपतीची पर्यावरणपूरक मिरवणूक हे विषय विद्यार्थिनींना चित्रकलेसाठी देण्यात आले होते.

...यांनीमिळवली बक्षिसे
स्पर्धेतील२५ विद्यार्थिनींमधून बक्षीसपात्र चित्रे निवडण्यात आली. प्रथम- प्राज्वल साकळकर, द्वितीय- रजनी राजपूत, तृतीय- सुरेखा सपकाळे उत्तेजनार्थ अश्विनी कोळी.
चाैबे पेट्राेल पंपातर्फे अायाेजित चित्रकला स्पर्धेत चित्र रंगवताना विद्यार्थिनी.