आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Helping Comity Also Give Generic Medicine

विद्यार्थी सहायक समितीही पुरविणार स्वस्तात औषधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जेनेरिक औषधी दुकान टाकण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननंतर विद्यार्थी सहाय्यता समिती पुढे सरसावली आहे. ही औषधे विक्रीसाठी एफडीएचा (अन्न व औषध असोसिएशन) परवाना घेणे बंधनकारक आहे.
महागड्या औषधांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागते आहे. यात जेनेरिकची स्वस्त औषधे असतानादेखील महागडी औषधे रुग्णांना खावी लागतात कशी? असा प्रo्न सर्वांनाच पडू लागला आहे. औषध संशोधनावर प्रचंड खर्च करावा लागतो म्हणून बॅ्रण्डेड कंपनीची औषधे बाजारात महाग मिळतात. मात्र, जेनेरिकच्या औषधांमध्येही तीच गुणवत्ता तरीही ही औषधे स्वस्त असल्यामुळे जळगावातील सर्वसामान्यांना ही औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेऊन मेडिकल दुकान टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ विद्यार्थी सहाय्यता समितीही पुढे सरसावली आहे. अन्न व औषध असोसिएशनचे कार्यालय एफडीए असोसिएशन, हॉल नं. 21, उद्योग भवन, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक 0253-2351200, 2351201)आणि बांद्रा येथे सव्र्हे नं. 341, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, बांद्रा (पूर्व) (दूरध्वनी क्रमांक -022-26592363-65, फॅक्स-26591959) येथे आहे.
परवान्याची प्रक्रिया - जेनेरिक औषध दुकान टाकण्यासाठी नागरिकांना सहज उपलब्ध होईल, असे 120 स्केअरफुटापर्यंत दुकान पाहिजे. शॉप अँक्टनुसार महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. नाशिक येथील एफडीएकडे (फूड अँण्ड ड्रग्ज असोसिएशन) अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकारी दुकानाची पाहणी करायला येतात. त्यानंतर एफडीएचा परवाना दिला जातो. दुकानावर बी. फार्मसी हा कोर्स केलेला एक कर्मचारी असावा असे निकष आहेत.
मनपाही सुरू करू शकते मेडिकल - महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फतही जेनेरिक मेडिकल दुकान सुरू केले जावू शकते. यासंदर्भात प्रशासनाने ठराव करून निर्णय घेतल्यास गोरगरीब जनतेला जेनेरिकची औषधे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे रोटरी क्लब, लायन्स अन्य सामाजिक उपक्रम राबविणार्‍या संस्थांनी देखील पुढाकार घेतल्यास जेनेरिक औषधांचा प्रo्न निश्चित सुटणार आहे.
‘प्रबोधन ग्राहक’च्या माध्यमातून जनजागृती - गोरेगाव येथे जेनेरिकचे एक मेडिकल दुकान असून प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली असून तिच्या माध्यमातून जेनेरिकच्या औषधांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. जेनेरिकचे मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी किमान 5 ते 10 लाखांची औषधे सुरुवातीला ठेवावी लागतात. ऐवढा पैसा गुंतविणे शक्य नाही. रोटरी, लायन्ससारख्या संस्था जेनेरिकची औषधी उपलब्ध करून देऊ शकतात. सुभाष देसाई, शिवेसेना आमदार, मुंबई
औषध संख्या जेनेरिकची किंमत बाजार किंमत
सिफ्रोफॉक्सिन 10 गोळ्या 11.10 55.00
सिफ्रोफॉक्सिन 10 गोळ्या 21.50 97.00
डिक्लोफे नॅक 10 गोळ्या 3.25 36.00
सिट्रीझिन 10 गोळ्या 2.75 20.00
पॅरासिटीमॉल 10 गोळ्या 2.45 10.00
कफ सिरफ लिक्विड 13.30 33.00