आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना मिळणार आता डेंग्यू जनजागृतीचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एडिस डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना डेंग्यू जनजागृतीचे धडे देण्यास सुरुवात झाली, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी पी.सी.तायडे यांनी दिली.

शाळेसाठी संवादकाची निवड
यात डेंग्यूची माहिती प्रभावीपणे देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकार्‍याच्या तालुका तर गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना माध्यमिक शाळेत जाऊन शिक्षकांना व मुलांना डेंग्यूअळी ओळख व प्रात्यक्षिके दाखवावे लागणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय 700 शाळांची यादी तयार केली आहे. शाळांच्या संख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुकास्तरावर जनजागृतीसाठी प्रत्येक शाळेसाठी संवादकांची निवड होणार आहे. शाळा भेटीपूर्वी या संवादकांची बैठक प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात यावी. यामध्ये मुलांना डेंग्यू जागृतीत संदेश दिला जात आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत कशा प्रकारे ही मोहीम राबवण्यात आली, याचा अहवाल मोहीम संपल्यानंतर मुख्याध्यापकांना सादर करावो लागणार आहे.
15 जुलैपर्यंत अभियान
डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. त्यावर कोणताही उपाय नसल्याने डासोत्पत्तीला प्रतिबंध घालणे हाच उपाय आहे. एडिस डासाची उत्पत्ती थांबवण्यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत 15 जून ते 15 जुलैदरम्यान जनजागरणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण जागृती करण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत विभागाच्या संचालकांनी सूचना दिल्या.
काय करावे लागणार ?
शंभर मुलांसाठी स्वतंत्र संवादक नेमला जाईल. मोठ्या शाळांमध्ये वैद्यकीय अधिकार्‍या ंना आरोग्य शिक्षण द्यावे लागेल. डासअळी तसेच प्रात्यक्षिकाचे इतर नमुने उपलब्ध करून द्यावेत. शाळा भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना दहा घरांचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण दर आठवड्याला करावे लागेल. मोहिमेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी डासमुक्तीची प्रतिज्ञा घ्यावी.
नाशिक येथे बुधवारी बैठक
४या अभियानाविषयी जिल्ह्यातील शाळांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. मोहिमेस सुरुवात झाली आहे. वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहायक याविषयी जनजागृती करीत आहेत. यासंबंधी बुधवारी उपसंचालकांसोबत नाशिकला बैठक होणार आहे. त्यात अजून काही बदल केले जाणार आहे.
पी.सी.तायडे, जिल्हा हिवताप अधिकारी