आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी तयार केली इलेक्ट्रिक स्कूटर, एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलेक्ट्रिक स्कूटरसोबत संशोधक विद्यार्थी प्राध्यापक. - Divya Marathi
इलेक्ट्रिक स्कूटरसोबत संशोधक विद्यार्थी प्राध्यापक.
जळगाव-एसएसबीटीकॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन (ई अॅण्ड टीसी)च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ‘स्वयंसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर’ तयार केली आहे. पायी चालण्यास लागणारा वेळ मेहनतीची बचत करण्यासाठी मोठ्या शहरांत अशा प्रकारच्या स्कूटरचा वापर करण्यात येतो.
स्कूटरमध्ये दोन चाके, मोटर्स, सेन्सर सिस्टिम, बॅटरी आणि कंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे. तसेच एका व्यक्तीला सहजपणे वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे. तिचा वापरताना चालक स्कूटरच्या प्लॅटफाॅर्मवर उभा राहून नैसर्गिकरीत्या शरीराला झुकवून त्या दिशेने स्कूटर वळवतो. प्लॅटफाॅर्मच्या दोन्ही बाजूला चाके आहेत. एक हॅण्डल असून, प्लॅटफाॅर्म हॅण्डल हे एक प्रकारे स्टेअरिंगचे काम करते. चालकाला स्वतला मागे-पुढे, डावी-उजवीकडे झुकवून स्कूटरचा वेग दिशेवर नियंत्रण मिळवायचे असते. या स्कूटरमध्ये दोन डीसी मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. बॅटरी चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १५ ते २० तास ताशी २० किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इंधनाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे ध्वनी वायुप्रदूषणापासून मुक्ती मिळते. प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, डॉ.संजय शेखावत, डॉ.आय.डी.पाटील, डॉ.एस.आर.सुरळकर प्रा.अमोल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अजय सोनवणे, नंदन चौधरी, पराग अग्रवाल आकाश ठाकूर या चार विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.

असे आहेत स्कूटरचे लाभ
- स्वयंचलित स्वयंसंतुलित
- रिचार्जेबल बॅटरीमुळे इंधनाची बचत
- प्रदूषणविरहित किंमतही कमी
- आकाराने लहान वजनाने कमी
- वर्दळीच्या ठिकाणी, प्रेक्षणीय स्थळे, कॉर्पोरेट परिसर, महाविद्यालये इंडस्ट्रियल परिसरात फिरण्यासाठी फार उपयुक्त.

‘आयईडीसी’अंतर्गत मिळाले अर्थसाह्य
याप्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाकडून ‘आयईडीसी’ (इनोव्हेशन अॅण्ड इंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट सेंटर)अंतर्गत एक लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे. अशा प्रकारच्या स्कूटरची भारतीय बाजारपेठेत अडीच ते तीन लाख रुपये किंमत आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प केवळ ७० हजार रुपयांत पूर्ण केला आहे.
संशोधन