आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर; समजुतीने मिटला वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याने शिक्षण विभागाची तक्रार आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एका विद्यार्थिनीने मंगळवारी थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या मांडला. कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी खुशामत करूनही ती बाहेर पडत नसल्याने थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. तरीदेखील ती ऐकण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे शेवटी त्या मुलीच्या आईला बोलवण्यात आले. तिची समजूत काढत अध्र्या तासानंतर तिला दालनाबाहेर काढण्यात आले.
वारंवार पाठपुरावा करूनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याने याबाबत थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार देण्यासाठी रार्जशी चौधरी ही विद्यार्थिनी गेली होती.
शिष्यवृत्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला
खाते नसल्यामुळे शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. आता ती केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मंजूरीनंतरच खात्यावर जमा होईल.
-शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी