आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दहावीचा पेपर देणार्‍या एका विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप करीत ती विद्यार्थिनी व पालक पोलिस ठाण्यात पोहोचले; मात्र ऐनवेळी पालकांनी माघार घेतल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. दरम्यान, शाळा प्रशासनाने मात्र संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे.
कोल्हे शाळेत शनिवारी दुपारी 11 ते 2 या वेळात भूगोल या विषयाचा पेपर देण्यासाठी सिंधी कॉलनी येथील शाळेची विद्यार्थिनी आली होती. पेपर सुरू असताना सुपरवायझर असलेल्या सोपान नारखेडे या शिक्षकाने तिच्या शेजारी बाकावर बसून तिची छेड काढली, असे मुलीने पेपर संपल्यानंतर पालकांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याचा प्रय} केला. दरम्यान काही वेळातच संस्थेचे संचालक तथा नगरसेवक ललित कोल्हे पोलिस ठाण्यात पोहचले. कोल्हे यांनी पालकांची समजूत काढली. यानंतर दुपारी 2 वाजता पालकांसह कोल्हे पुन्हा शाळेत आले. तेथे तासभर झालेल्या चर्चेअंती पालकांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
3.35 वाजता समझोत्याचा फोन
दुपारी 1 वाजेपासून सुरू झालेला हा प्रकार 3.35 वाजता आटोपला. नगरसेवक कोल्हे तसेच माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनीही पालकांची समजूत काढली. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी मुलीकडून माहिती घेतली. पानभर तक्रार लिहिली गेली. मात्र नंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करीत गुन्हा दाखल होऊ दिला नाही. मुलीच्या वडिलांनी दुपारी 3.30 वाजता शनिपेठ ठाण्यात फोन केला. आम्ही प्रकरण आपसात मिटवून घेत असल्याचे त्यांनी ठाणे अंमलदार उमाकांत चौधरी यांना सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी पालकांना समझोता झाल्याचा जबाब नोंदविण्यासाठी सायंकाळी पोलिस ठाण्यात बोलावले.
मोबाइलमध्ये शूटिंग केल्याचे भासवले
विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, गोंधळ घालू नये म्हणून दटावले होते. मोबाइलमध्ये शूटिंग करून स्क्वॉडला दाखवेल असे भासवले होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनीने पालकांना सांगितले. प्रत्यक्षात मी शूटिंग केले नव्हते, असेही नारखेडे यांचे म्हणणे आहे.