आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडचे विद्यार्थी अनुभवणार भारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नागालँडया राज्यात बोडो आतंकवाद मोठ्याप्रमाणात पसरलेला आहे. अनेक समस्यांशी तेथील विद्यार्थी झुंज देत आहेत. शाळेत जाण्यापासून ते खाण्यापर्यंत कठीण परिस्थितीत दविस काढत असताना भारतात खूप काही बघण्यासारखे आहे, ते अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. खूप वेगळा अनुभव अनुभवायला मिळत असल्याच्या भावना नागालँडच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
पुण्यातील असीम फाउंडेशन आणि आसाम रायफल्स यांच्यातर्फे १३ ते २० डिसेंबरदरम्यान नागालँडच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक टूरचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून भारतातील अशा दुर्गम भागातील मुलांना इतर राज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आझाद हिंद एक्स्प्रेसने ही मुले पुण्याला गेली. या वेळी जळगाव रेल्वेस्थानकावर मू.जे.महाविद्यालयातील संरक्षण सामरिक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या मुलांशी संवाद साधला. शासनातर्फे पुढाकार घेत हा उपक्रम राबवण्यात आला.

-महाविद्यालयाने असे उपक्रम राबवायला हवेत. महाराष्ट्रातील मुले सुखसोयींनी परिपूर्ण आहेत. परंतु नागालँड येथील मुलांनी दहशतवाद अनुभवला आहे. या अनुभवाविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी. या उद्देशाने ही भेट घेतली. -प्रा. योगेश बोरसे

शहरातील विद्यार्थ्यांचा अनुभव
येथीलविद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना काही फूड पॅकेट्स दिली. विभागाचे प्रा. योगेश बोरसे, हरीश बारी, राकेश पाटील, सागर पाटील, चरणसिंग राजपूत या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या पूर्ण उपक्रमाची माहिती जाणून घेतली. नागालँडच्या आदविासी भागात राहणारी ही मुले खूप हिमतीने संघर्षाने आयुष्य जगतात.
२४ विद्यार्थ्यांचा होता संघ
हा१२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ आहे. जिरीओ स्कूल आणि लटििल्स फ्लॉवर या शाळेतील २४ मुले आहेत. त्यांच्यासोबत आसाम रायफल्सचे आयजी मनोज नरावणे, मेजर महेश जाधव, मेजर सुरभी छुटिया तसेच शिक्षक आहेत. पुणे येथील अक्षरनंद ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची मुले त्यांच्याशी संवाद साधणार असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेची त्यांना ओळख करून देणार आहेत. त्यानंतर ही मुले मुंबईतील पवई, गेट वे ऑफ इंडिया, पुण्यातील इंदिरा मॅनेजमेंट, सदन कमांड, एनडीए, दापोली येथील समुद्र, लोकसाधना संस्था येथे भेट देणार आहेत.