आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महाविद्यालयांत ‘युवा सेने’चे वर्चस्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाविद्यालयीनविद्यापीठाच्या विद्यार्थी सचविपदाच्या निवडणुकीत युवासेनेने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. शहरातील सहा महाविद्यालयांमध्ये युवासेनेचे विद्यार्थी निवडून आले आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

मू.जे. महाविद्यालयात मोहिनी राऊत हिची बनिविरोध निवड झाली. पीजीसीएसटीआर येथे सचिन खैरनार हा निवडून आला. तसेच शासकीय अभियांत्रिकी, बाहेती महाविद्यालय, जी.एच. रायसोनीच्या दोन्ही महाविद्यालयांत युवा सेनेचे विद्यार्थी निवडून आले. नूतन मराठा महाविद्यालयात मनसेची मृणाली झणझणे ही सचिव म्हणून निवडून आली.

धनाजीनाना महाविद्यालयात मतदान
धनाजीनाना चौधरी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन केली. सचविपदासाठी प्रवीण वानखेडे, कल्पेश मराठे, भीमराज हडस या तिघांनी अर्ज दाखल केले, तिन्ही अर्ज वैध ठरले आणि कुणीही माघार घेतल्याने प्राचार्यांच्या दालनात मतदान घेण्यात आले. यात कल्पेश मराठे याने सर्वाधिक मते मिळवून विजय प्राप्त केला. याच संस्थेच्या कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कोमल महाजन हिची निवड झाली आहे.

रायसोनीतअंकुश, हर्षची निवड
जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी परिषदेची निवड बनिविरोध झाली. प्रीती अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यात व्यवस्थापनशास्त्र विभागात सचविपदी एमबीए प्रथम वर्षाचा अंकुश जैन तर अभियांत्रिकीत अंतिम वर्षाचा हर्ष पटेल याची निवड झाली आहे. व्यवस्थापनशास्त्र विभागात सांस्कृतिक प्रतिनिधी रिया सुरतवाला, क्रीडा प्रतिनिधी नीरज सेठिया, विद्यार्थी प्रतिनिधी रिया लोढाया यांची तर अभियांत्रिकीत सांस्कृतिक प्रतिनिधी श्वेता यादव, क्रीडा प्रतिनिधी स्वप्निल मराठे, विद्यार्थिनी प्रतिनिधी चैताली वाणी यांचीही निवड केली.

मणियारमध्येअपूर्वा दलाल
मणियारविधी महाविद्यालयात बीएएलएलबी अपूर्वा दलाल हिची विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बनिविरोध निवड झाली.

बाहेतीतराहुल खैरनार
बाहेतीमहाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून राहुल खैरनार याची बनिविरोध निवड झाली. सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ऋषिकेश पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी राधिका माहुलीकर, क्रीडा एनसीसी प्रतिनिधी भूषण नेवे, रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी राहुल खैरनार यांचीही निवड झाली.

शासकीयअभियांत्रिकीत वैभव बुले
शासकीयअभियांत्रिकत विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून वैभव बुले याची निवड झाली. सांस्कृतिक प्रतिनिधी शुभम सादतकर, क्रीडा प्रतिनिधी योगेश नेवे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रोशनी चांडक, मिताली शेवाळे तर मागासवर्गीय प्रतिनिधी ओशिन तडवी भावेश पाटील यांचीही निवड झाली.

वैभव बुले
अपूवार् दलाल
राहुल खैरनार
कल्पेश मराठे