आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंकण्यासाठी कोवळ्या उन्हात सराव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत कोवळे उन्ह अंगावर झेलत जिंकण्याच्या ईर्षेने विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रविवारी सादरीकरणापूर्वी रंगीत तालीम करण्यावर भर दिला होता. त्यामुळे जीटीपी महाविद्यालयाच्या संपूर्ण मैदानालाच रंगमंचाचे स्वरूप आल्याचे दिसून आले.

युवारंग महोत्सवात मूकनाट्य, विडंबननाट्य, समूहगीत, मिमिक्री, वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, सुगम संगीत, लोकनृत्य आदी स्पर्धा होत आहेत. अंितम सादरीकरणावेळी कोणतीही चूक होऊ नये, इतर स्पर्धकांच्या तुलनेत आपले सादरीकरण उजवे ठरावे यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी सात वाजेपासूनच जीपीटी महाविद्यालयाचे मैदान गाठत सराव करण्यावर भर दिला होता. मैदानावर जागोजागी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप दिसून आले. मैदानात एकाच वेळी बंजारा, आदिवासी, होळी नृत्य सुरू होते. त्याचबरोबर मराठी, हिंदी चित्रपटांच्या गीतावर अनेकांनी ताल धरला होता. एकमेकांशी स्पर्धा असली तरी इतरांना सहकार्य करण्याचा विसरही विद्यार्थ्यांना पडला नसल्याचे दिसून आले.
नृत्याचा सराव करताना स्पर्धक.

युवारंग युवक महोत्सवात रविवारी होणाऱ्या स्पर्धेपूर्वी जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर कोवळे उन्ह अंगावर झेलत सराव करताना स्पर्धक.