आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीवर वृद्धाकडून बलात्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नातीसमान असलेल्या अल्पवयीन (वय 17) विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या एका 60 वर्षीय वृद्धासह एका तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील मोंढाळा येथील ही दहावीत शिकणारी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे.

हौशिलाल बेलदार (वय 60) असे बलात्काराचा आरोप असलेल्या संशयिताचे नाव असून तोच आरोप अशोक चांगो पारधी (वय 26) याच्यावरही ठेवण्यात आला आहे. दोघेही मोंढाळा गावचेच रहिवासी आहेत. या दोघांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी दमदाटी करून तिचे लैगिंक शोषण केले. बलात्काराच्या घटनेबद्दल कोणालाही माहिती दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. त्यामुळे चार महिने या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. अलिकडेच तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा वरील दोघांनी बलात्कार केल्याचे तिने त्यांना सांगितले.

शुक्रवारी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे कुटुंबीय आणि हौशिलाल बेलदार यांच्यात मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येते. पीडित मुलीच्या जिल्हा रुग्णालयातील जबाबावरून शुक्रवारी (दि.25) सायंकाळी तालुका पोलिस ठाण्यात हौशिलाल बेलदार आणि अशोक चांगो पारधी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक संतोष साबळे तपास करीत असून दोन्ही संशयित फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.