आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Student Suicide Cases In Jalgaon News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुले-विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने समाज सुन्न

7 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
जळगाव - शैक्षणिक ताण, आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझं यासारख्या कारणांनी गेल्या तीन महिन्यांत शालेय विद्यार्थी व महाविद्यालयातील तरुणांनी आत्महत्या करण्याच्या 12 घटना घडल्या आहे. या घटनांनी समाज सुन्न झाला आहे. मुलां,तरुणांमध्ये वाढणारे आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी पालक, शाळा, महाविद्यालय, समाज, सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

एप्रिल ते 22 जून या सुमारे तीन महिन्यांत आत्महत्या करणार्‍यांमध्ये तीन जण 16 वर्षिय, चार जण 19 वर्षीय, दोघे 22 वर्षीय आहेत. तर 28 वर्षांच्या दोघा जणांचा समावेश आहे. त्यातील आठ जणांनी गळफास घेऊन तिघांनी विष प्राशन करून तर एकाने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. क्षुल्लक वाद, मतभेद, अभ्यासाचा ताण, मनाविरुद्धचे निर्णय यासारख्या कारणांनी त्यांनी टोकाचा विचार केल्याने या घटना घडल्या आहेत.
शाळा बदलल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; मेहरूणमधील घटना; राहत्या घरी ओढणीने घेतला गळफास

जळगाव - मेहरूण तलाठी कार्यालयाशेजारी राहणाºया दहावीच्या विद्यार्थिनीने रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवव्या वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थिनीची पालकांनी शाळा बदलल्याचा राग आल्याने तिने आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.

मेहरूण तलाठी कार्यालयाजवळील रहिवासी मयूरी सुनील चांदेलकर (वय 16) ही विद्यार्थिनी नववीत उत्तीर्ण होऊन नुकतीच दहावीत गेली. मेहरूण परिसरातील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात तिचे नववीपर्यंतचे शिक्षण झाले. मात्र, शाळा लांब असल्याने तिच्या पालकांनी तिचा श्रीराम माध्यमिक कन्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र, मयूरीला हे मान्य नव्हते म्हणून पालकांशी तिचा किरकोळ वादही झाला होता. रविवारी तिची आई, विवाहित बहीण माधुरीकडे रिंग रोड येथे गेली होती. भाऊ घन:श्याम प्लम्बिंगच्या कामासाठी गेला होता. वडील सुनील चांदेलकर हे स्टेट बॅँक आॅफ इंडियात शिपाई म्हणून कार्यरत असून गेल्या अनेक दिवसांपासून ते ही आजारी असल्याने घरीच असतात. रविवारी घरात मयूरी आणि तिचे वडील दोघेच होते. वडिलांनी पाणी मागण्यासाठी तिला हाक मारली. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी आरडा ओरड केला. आजूबाजूच्या नागरिकांनी घरात बघितले असता मयूरीने घराची खोली बंद करून स्वत:च्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घराचा दरवाजा तोडून तत्काळ तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयूरी गेल्या तीन महिन्यांपासून टायफाइड, मलेरिया आणि न्यूमोनिया या आजारांनाही कंटाळली होती, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.
तीन महिन्यांत 12 मुले, विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या
5 एप्रिल मीरा विश्वनाथ कांडेलकर, मुक्ताईनगर - विषप्राशन वय 23
शकील बिस्मिल्ला पिंजारी, मुक्ताईनगर- विषप्राशन वय 18
14 एप्रिल - सतीश संतोष पाटील, शाहूनगर - गळफास वय 28
3 मे - सचिन सुरेश ठाकूर, पिंप्राळा- रेल्वेखाली वय 19
14 मे - पंकज हरिश्चंद्र पाटील, पाटीलगढी, रामपेठ - विषप्राशन वय 28
25 मे - प्रियंका नयन मुखर्जी, गोदावरी इंजिनिअरिंग होस्टेल - गळफास वय 19
28 मे - पवन भागवत शिरसाठ, समतानगर- गळफास वय19
28 मे - करिश्मा रवींद्र सोनवणे, कांचननगर- गळफास वय 16
6 जून - सोनाली रमेश टेकाडे, शिवकॉलनी- गळफास वय 22
8 जून - नीलेश आर.सोनवणे, शिवकॉलनी - गळफास वय 19
16 जून - समीर रमाकांत चौधरी, सागरपार्क - गळफास वय 16
22 जून- मयूरी सुनील चांदेलकर, मेहरुण - गळफास वय 16
काय केले पाहिजे पालक-शिक्षकांनी?
 • शाळा, महाविद्यालयात समुपोदेशकाची नेमणूक केली पाहिजे.
 • शिक्षक प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात यावे.
 • आई-वडिलांनी घरातील वातावरण चांगले ठेवावे.
 • पालक- मुलांमधील संवादात वाढ व्हावी.
 • पालकांनी आठ दिवसातून तर शिक्षकांनी महिन्यातून एकदा अवांतर संवाद साधावा
 • हा संवाद आई-वडील किंवा मुलं केंद्रीत नसावा.
 • पाल्य, विद्यार्थी तणावाखाली आहे हे ओळखायला शिकावे.
 • भावना समजून घेता आले पाहिजे.