आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडच्या विद्यार्थ्याची जळगावात आत्महत्या, गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एसएमआयटी महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या व मुळ सिल्लोड तालुक्यातील रहिवाशी असलेल्या निवृत्ती काकडे या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
निवृत्ती मूळ धानोरा (ता. सिल्लोड) येथील रहिवासी. शिक्षणासाठी तो जळगावात आला हाेता. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसोबत तो खोलीत राहायचा. मंगळवारी सकाळी सर्व मित्र महाविद्यालयात गेले, निवृत्ती मात्र खाेलीवरच होता. दुपारी अंकुश जावळे हा महाविद्यालयातून खोलीवर आला. तेव्हा समोरचे दार आतमधून बंद होते. त्याने तीन ते चार वेळेस दार ठोठावले; मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तो मागच्या दरवाजाकडे गेला. हा दरवाजा उघडाच होता. घरमालकाचा मुलगा पंकज व अंकुशने मागच्या भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. या वेळी किचनमध्ये निवृत्ती पंख्याला गळफास घेऊन लटकलेला दिसला. त्याला बघून अंकुश जोरात ओरडला, त्यामुळे शेजारी धावत आले व त्यांनी पोलिसांना बोलावले. दरम्यान, निवृत्तीच्या दप्तरात पोलिसांना त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी अन् मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

काय लिहिले चिठ्ठीत
पप्पा, तुम्ही सक्षम आहात...

‘आय लव्ह यू पप्पा, तुम्ही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समर्थ आहात, परंतु मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मी स्वत:चे आयुष्य घडवू शकत नाही. तुमचे पुष्कळ पैसे व्यर्थ घालवले आहेत. कोणत्याही सुधारणेशिवाय आणि फायद्याशिवाय...', असे निवृत्तीने वडिलांना उद्देशून लिहिले.
आई तू तर माझे दैवत...
‘तू केवळ माझी आई नव्हेस, तर माझ्यासाठी दैवतच आहेस. तू प्रत्येकाची काळजी घेतेस, परंतु मी तुझ्याशी निष्काळजीपणे वागलो. सॉरी मम्मी... आय लव्ह यू...', असे त्याने आईला उद्देशून लिहिले आहे. छोट्या भावाला ‘तू आपल्या कुटुंबाची काळजी घे... मी तुझ्यासोबत आहे. आय लव्ह यू...'