आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये अभ्यासिकांची जेवढी गरज आहे, तेवढी जळगावात नसली तरी व. वा. वाचनालयाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या अभ्यासिकेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. विशेषत: शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सोयीची ठरत आहे.
बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सोय
शहरात विविध शिक्षण संस्था असून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेरगावचे विद्यार्थी शहरात रूम करून राहतात. एका रूममध्ये किमान पाच विद्यार्थी राहत असल्याने अभ्यास करताना अडचणी येतात. त्यामुळे अभ्यासासाठी उद्यानाचा पर्याय निवडला जातो. मात्र, सायंकाळी नागरिकांची गर्दी वाढल्यानंतर पुन्हा रूमकडे परतावे लागते. अभ्यासिकेत या अडचणी येत नाही.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढल्यास अभ्यासिकेची वेळ रात्री 10 पर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. घरात अभ्यासाचे वातावरण मिळत नसल्याने अभ्यासिका ती गरज पूर्ण करते. सर्व विद्यार्थ्यांसाठी सोयीची ही अभ्यासिका असून 3 महिन्यांत उत्तम प्रतिसाद आहे. अनिल अत्रे, ग्रंथपाल, ववा वाचनालय
शहरात एकमेव अभ्यासिका
व. वा. वाचनालयाने सर्व महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शहरातील एकमेव अभ्यासिका आहे. डिसेंबर 2012 मध्ये सुरू झालेल्या या अभ्यासिकेत सध्या 30 विद्यार्थी नियमितपणे येतात. सकाळी 8 ते सायंकाळी 6.30 पर्यंत अभ्यासिका सुरू असते. शहरात महाविद्यालयांव्यतिरिक्त अभ्यासिका नाहीत. व. वा. वाचनालयाच्या सचिव संगीता अट्रावलकर यांनी पुण्याच्या धर्तीवर ही अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे विद्यार्थ्यांत वाढते रुची
कोंदट वातावरण : शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी महाविद्यालयापासून जवळच अशी रूम शोधतात. एकापेक्षा जास्त मुले एकाच रूममध्ये राहत असल्याने कोंदट वातावरणात अभ्यासात मन लागत नाही.
भारनियमनाचा त्रास : वर्षभरासाठी रूम घेतली असल्याने फॅन, कूलर यांसारख्या फारशा सुविधा विद्यार्थ्यांकडे नसतात. त्याचबरोबर भारनियमनामुळे शहरातील विद्यार्थ्यांनाही अभ्यासात मूड लागत नाही.
गोंगाटामुळे व्यत्यय : मध्यवर्ती भागात, तसेच दाट वस्तीत घरे जवळजवळ असल्याने आवाजाचा व्यत्यय त्रासदायक ठरतो. घरात किंवा शेजारी टीव्ही सुरू असेल तर त्या आवाजाचाही त्रास होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.