आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांचे जळजळीत भाष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- युवारंग महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर देखावे सादर केले. त्यात वाढत्या व्यसनाधीनतेचे परिणाम, विकासासाठी आवश्यक सामाजिक एकोपा, आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व आदी विषयांचा समावेश होता.
येथील जुन्या पोलिस कवायत मैदानापासून सकाळी नऊ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. महोत्सवात गेल्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी अग्रस्थानी होते. तर यजमान नंदुरबारच्या जीटीपी महाविद्यालयाचा संघ सर्वात शेवटी होता. शाेभायात्रेत धुळे जिल्ह्यातील २०, जळगाव जिल्ह्यातील ३८ आणि नंदुरबार जिल्ह्यातील १४ महािवद्यालयांचा समावेश होता. शोभायात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. जळगावच्या एम.जे. महािवद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता या विषयावर, अमळनेरचे प्रताप महाविद्यालय, चाळीसगाव, फैजपूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर देखावा सादर केला. शहादा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेची अंत्ययात्रा काढली तर धुळयाच्या झेड. बी. पाटील महाविद्यालयाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
आदिवासी संस्कृतीचे दर्शन
नंदुरबारजिल्ह्यातील धडगाव, शहादा, अक्कलकुवा येथील विविध महािवद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी परंपरेचे दर्शन घडविले. यजमान जीटीपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहीद शिरीषकुमार यांच्या जीवनावर देखावा सादर करून लक्ष वेधले.
सणांचीकरून दिली ओळख
शोभायात्रेचासमारोप जीटीपी महाविद्यालयाच्या आवारात जल्लोषात झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी भारतीय उत्सव, सण, परंपरांची ओळख करून देणारे देखावे सादर केले. त्यात संक्रांत, हळदीकुंकू, रक्षाबंधन, विवाह सोहळा, भाऊबीज, कानबाई आदी सणांचा समावेश होता.