आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटी परीक्षा देऊन परतताना विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रातून सीईटीची परीक्षा देऊन परत जाणाऱ्या भडगाव येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाळधीजवळ समाेरून येणाऱ्या दुचाकीने गुरुवारी धडक दिली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले अाहेत. 

भडगाव येथील शुभम देविदास गांगुर्डे (वय १८), हर्षल राजेंद्र वाघे (वय १९), धनंजय उमाकांत माळी (वय १८) हे तिघे विद्यार्थी गुरुवारी सीर्इटीची परीक्षा देण्यासाठी अाले हाेते. त्यांची परीक्षा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रात हाेती. परीक्षा संपल्यानंतर ते दुचाकीने पाराेळ्याकडे जात हाेते. त्याचवेळी समाेरून बीएसएनएलचे कर्मचारी सुरेश माणिक मगरे (वय ६०) हे दुचाकीवर येत हाेते. दाेघांची दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले अाहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरेश मगरे यांना खासगी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पाळधी पाेलिस दूरक्षेत्रात नाेंद करण्यात आली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...