आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार हजार विद्यार्थ्यांचा बसने प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तोट्यातून बाहेर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून होणार्‍या प्रयत्नांना सर्वाधिक प्रतिसाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून मिळतो. भुसावळमध्ये वर्षभरात चार हजार विद्यार्थ्यांनी महामंडळाची पास घेऊन बसद्वारे प्रवास केल्याने आगाराला बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे.

बसच्या सुरक्षित प्रवासाला विद्यार्थी प्राधान्य देतात. इतर वाहनांच्या प्रवास भाड्याच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून 30 ऐवजी केवळ 10 दिवसांचे भाडे आकारले जाते. त्यांना सवलतीच्या दरात मासिक पास मिळतो. वर्षभराच्या कालावधीत तालुक्यात सुमारे चार हजार विद्यार्थी सवलतीच्या दरातील पासचा आधार घेतला. यामध्ये 1800 विद्यार्थिनींचा समावेश आहे. यासह त्रैमासिक प्रवास भाड्याच्या पासेसमध्ये सुद्धा सवलत मिळते. दररोज अप-डाऊन करणार्‍या 900 प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.
सुटीच्या काळात सवलत
लांब पल्ल्याहून विविध शहरात शिक्षणासाठी गेलेल्या अथवा आलेल्या विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवसात घरी जाण्यासाठी प्रवासभाड्यात 50 टक्के सवलत मिळते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी सुटीच्या काळात घरापर्यंतच्या प्रवासासाठी बसला प्राधान्य देतात.
नैमित्तिक करारात 1 ते 3 रुपयांची सूट
एसटीच्या नैमित्तिक करारावर कमी गर्दीच्या हंगामात मिळणार्‍या बसचे प्रती किलोमीटरचे दर 1 जुलै ते 28 फेब्रुवारीपर्यंत सुधारित असतात. जास्त गर्दीच्या हंगामातील दरापेक्षा एक ते तीन रुपयांपर्यंत सवलत या काळात मिळू शकते.
आवडेल तेथे प्रवास
शिवाय आवडेल तेथे प्रवास योजनेचा किमान 500 प्रवासी आणि वर्षभराचे 200 रुपयांचे कॅशकार्ड घेऊन प्रवासभाड्यात 10 टक्के सूट मिळवणारे प्रवासी वाढले आहेत. अपंग व्यक्तीला 75, सहकार्‍यास 50 टक्के सूट मिळते. वर्षभरात 600 अपंगांनी पास काढून बस प्रवास केला. बसस्थानकावर जनजागृतीवर भर दिला जात आहे.
विद्यार्थ्यांची सुविधा
४विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सहभागी झाले आहेत.
एम. बी. पांडव, वाहतूक नियंत्रक