आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पौष्टिक भोजन मिळत नसल्याने शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची 50 किलोमीटर पायपीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा- धडगाव तालुक्यातील तलाई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर पौष्टिक भाेजन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी तब्बल पन्नास किलोमीटर पायपीट करीत तळोदा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर व्यथा मांडल्या. 


तलाई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी गऱ्हाणे मांडण्यासाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता तलाई येथून तळोदा येथील प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरवले. त्यानंतर तब्बल ५० किलोमीटर पायपीट करत सर्व विद्यार्थी सायंकाळी साडेसहा वाजता तळोदा प्रकल्प कार्यालयात आले. विद्यार्थी पायपीट करीत तळोदा प्रकल्प कार्यालयात येत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अंजू पाडवी, सुनील पाडवी, दयानंद चव्हाण, मोग्या भील, नवनाथ ठाकरे आदींनी विद्यार्थ्यांना गाठले. तसेच त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सर्व विद्यार्थी प्रकल्प कार्यालयात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाधिकारी विनय गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, सहायक प्रकल्पाधिकारी अशोक तांबोळी, सहायक प्रकल्पाधिकारी शैलेश पटेल यांना समस्यांची माहिती दिली. उशिरापर्यंत विद्यार्थ्यांसोबत चर्चा सुरू होती. 


विद्यार्थ्यांच्या समस्या...
-  रोज दिले जाते शिळे अन्न. 
-  मुख्याध्यापक येत नाही वेळेवर.
-  बीजगणित भूमिती या विषयांचे शिक्षक नाही. 
-  आश्रमशाळेत संगणक नाही. 
-  शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी काम करायला लावतात. 
-  विद्यार्थ्यांना जेवणात मिळतात फक्त वांगे, भोपळा. 
-  विद्यार्थ्यांना भूगोल, इतिहास विषय शिकवला जात नाही. 
-  गणवेशाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. 


शिक्षकाची नियुक्ती 
आश्रमशाळेतबीजगणिताच्याशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शिक्षक उद्या शुक्रवारपासून रुजू होणार आहेत. मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात येईल. ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात येईल. 
- विनय गौडा, प्रकल्पाधिकारी तळोदा. 

बातम्या आणखी आहेत...