आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अापल्या नेत्यांचा भ्रष्टाचार अभ्यासावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालकमंत्री एकनाथ खडसेंवर अाराेप करणाऱ्यांनी अातापर्यंतच्या विकासकामांचा अभ्यास करून सक्षम पालकमंत्री कसा असावा? ते तपासावे. या बाेलक्या बाहुल्यांनी अाधी त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास करून शहराची दयनीय अवस्था काेणामुळे झाली? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपने पत्रकाद्वारे केली.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, शिवराम पाटील, गजानन मालपुरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री खडसेंवर अाराेपांच्या फैरी झाडल्या हाेत्या. त्याला साेमवारी भाजपतर्फे चाेख उत्तर देण्यात अाले अाहे. भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशाेक लाडवंजारी यांनी काढलेल्या पत्रकात अाराेप करणाऱ्या बाेलक्या बाहुल्यांचे बाेलवते धनी काेण? असा सवाल करत िशवसेना जिल्हाप्रमुख महानगरप्रमुखांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली अाहे. सुरेश जैन हे अामदार असताना तसेच महापालिकेत शिवसेनेला दाबून खाविअा सत्तेत असताना शहराच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून नकाे त्या कामांना प्राधान्य दिलेे. तसेच जनहिताचा पैसा केवळ भ्रष्टाचार करण्यास वाव मिळावा, म्हणून खर्च केला जात असताना मूग गिळून का बसले, असा सवाल केला अाहे. पालिकेत सेनाप्रणित खाविअाचे बहुमत असून महापाैर उपमहापाैर त्यांचे अाहेत. त्यांनी पालिका कर्जमुक्त करण्यासाठी किती प्रयत्न केले? हा जाब िवचारण्यास अाराेप करणारा कंपू का गेला नाही? असा प्रश्न विचारला अाहे. दरम्यान, जिल्हाप्रमुखांनी या अाराेपांबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लाडवंजारींनी केली अाहे.

लेवा समाज मंडळातर्फे शिवराम पाटलांचा निषेध
शिवसेनेचेशिवराम पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया व्यक्त हाेण्यास सुरुवात झाली अाहे. अ.भा.लेवा समाज उत्कर्ष मंडळाच्या बैठकीत पाटील यांचा निषेध करण्यात अाला. खडसेंवर केलेल्या टीकेची माफी मागावी, अन्यथा तीव्र अांदाेलन करण्याचा इशारा पत्रकाद्वारे संस्थेचे सचिव सुनील फालक यांनी दिला अाहे. बैठकीला डाॅ.भरत महाजन, प्रा.मनाेहर पाटील, दिलीप पाटील, सुरेंद्र पाटील, किरण भारंबे, रमेश नेमाडे, किशाेर महाजन, विजय फिरके, अतुल चाैधरी, डाॅ.रवींद्र पाटील उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...