आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभ्यासाचे नियोजन हवे; पालकमंत्री सावकारेंचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ / वरणगाव- मराठी मुलांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना घोकमपट्टी करू नये. अभ्यासाचे अचूक नियोजन केले तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी केले.

वरणगावात मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवारी आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सी. आर. पाटील यांचे सुपूत्र जिग्नेश पाटील होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, अँड. रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, समाधान पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, रमेश पाटील,राजेंद्र विश्वनाथ चौधरी, विश्वनाथ पाटील, पंचायत समिती उपसभापती शेख खलील शेख गनी, सदस्य राजेंद्र पुंडलिक चौधरी, जिल्हा बॅँकेचे संचालक हेमंतकुमार साळुंखे, सरपंच रोहिणी जावळे, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक धीरेंद्र देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा तावडे व योगेश पाटील यांनी केले. आभार संतोष शेळके यांनी मानले.

गतिमान कालचक्राचा वेध घेऊन मुलींना उच्च शिक्षणासाठी समाजाने बाहेर पडू द्यावे. दृष्टिकोन आता व्यापक ठेवण्याची गरज आहे, असे मत अभियंता पूजा देशमुख या सत्कारार्थी विद्यार्थिनीने व्यक्त केले. तर बक्षिसे नेहमीच मिळतात, मात्र समाजाकडून झालेला गौरव हा महत्त्वाचा आहे. वरणगाव शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या जवळपास असतानाही गावात क्रीडांगणाची सुविधा नसल्याने क्रीडागुणांना वाव मिळत नाही, असे मत सत्कारार्थी विद्यार्थी अमित तावडे याने व्यक्त केले.

10 लाखांचा निधी
पालकमंत्री संजय सावकारे यांनी वरणगाव येथील मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी 10 लाखांचा निधी देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली. ग्रामपंचायतीने मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेला भूखंड दिला आहे. त्याच्यावर हे मंगल कार्यालय उभारले जाणार आहे. पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी यांनी एक लाखाची देणगी जाहीर केली आहे.


मुलांमधील गुण ओळखा
पाल्यांच्या क्षमता ओळखून त्या विकसित केल्या पाहिजेत. गावागावात नि:शुल्क मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे गरजेचे आहे, असे मत बेंडाळे महाविद्यालयाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी व्यक्त केले.

यशासाठी जिद्द, चिकाटी ठेवा
ज्ञान मिळवण्यासाठी आधुनिक युगात विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. जिद्द, चिकाटीने पर्शिम घेतले तर यशाचे शिखर गाठता येते. असा सल्ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी दिला.