आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Devare News In Marathi, Congress, BJP, Divya Marathi

कॉँग्रेस मेळाव्याकडे देवरेंनी फिरवली पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - कॉँग्रेसच्या माध्यमातून धुळे तालुक्यात नेतेपद मिळविणार्‍या सुभाष देवरे यांनी भाजपच्या उमेदवारीची आशा अद्यापही सोडलेली नाही. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी गुरुवारी कॉँग्रेसच्या मेळाव्याकडे पाठ फिरविली. त्यांना कॉँग्रेसच्या व्यासपीठावर आणण्यात नेत्यांनाही अपयश आल्याची चर्चा या वेळी होत होती.


धुळे तालुक्यात सुभाष देवरे हे कॉँग्रेसमधील बडे प्रस्थ मानले जाते. त्यांच्या सहभागाशिवाय कॉँग्रेसचा निर्णय होत नाही. याच देवरेंना कॉँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद आणि महाफेडचे चेअरमनपदही मिळाले होते. मात्र, देवरे यांना सध्या भाजपच्या उमेदवारीचे वेध लागले आहे.


धुळे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरायला शनिवार (दि.29) पासून सुरुवात होणार आहे. आता कॉँग्रेस व भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. तरीसुद्धा देवरे यांची उमेदवारी मिळविण्याची आशा संपलेली नाही. धुळे तालुक्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा गुरुवारी हिरे भवनात मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात देवरे यांची अनुपस्थिती सगळ्यांना खटकत होती. त्यांना भाजपचे तिकीट मिळाले नाही म्हणून ते त्यांच्या मेहुण्यांनी घेतलेल्या मेळाव्याला हजेरी लावतील, असे राजकीय वतरुळात बोलले जात होते.


भाजपचा मोह सोडवेना
देवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांना भाजपचा मोहही सोडवत नाहीये. भाजपने त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे पुनर्वसन विधानसभेतून होईल का, हा प्रश्न आहे.


नाराजीचा फटका
सुभाष देवरे हे अद्यापही कॉँग्रेसपासून फटकून वागत असल्याचे दिसून आले. दुसरी बाब म्हणजे माजी मंत्र्यांच्या जवाहर गटाशी असलेला घरोबाही त्यांनी तोडला असल्याचे दिसून आले. देवरे हे नाराज असल्याची आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. ते तसे नाराज असण्याचे कारण राजकारणाशी जोडले जात आहे. देवरे नाराज असतील तर त्यांच्या नाराजीचा फटका कॉँग्रेसच्या उमेदवाराला पुन्हा एकदा बसू शकतो, असे संकेत मिळायला लागले आहेत.