आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववीत ४७ टक्के; आता नऊ कंपन्या, अमेरिकेतही उभारले अायटी उद्याेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इयत्ता नववीमध्ये केवळ ४७ टक्के मिळाल्यानंतर अवघ्या २० वर्षांत नऊ आयटी कंपन्यांचा मालक बनण्याची किमया धुळे येथील अनिवासी उद्योजक संजीवकुमार विनायक दहिवदकर यांनी केली आहे.
नववीच्या वर्गात कमी टक्के मिळाल्यामुळे दहिवदकर यांना शिक्षकांनी शिकवणीसाठी नकार दिला होता. याप्रसंगामुळे हतबल न होता चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी ही भरारी घेतली आहे. २० वर्षांतील त्यांच्या या यशाचा प्रवास चित्तवेधक आणि प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे दहिवदकर हे या उद्योगातून मिळालेल्या पैशांचा उपयोगही भारतातील कमी गुण मिळवणाऱ्या मुलांच्या विकासासाठी करतात. दहिवदकर यांच्या बालपणीच आईचे छत्र हिरावले गेले. एकत्र कुटंुब पद्धतीत घर चालवताना त्यांच्या वडिलांची दमछाक होत असे. त्यामुळे उद्योग करण्याचे विचार बालपणापासून येत होते. मिसरुड फुटलेला संजीव मग दिवाळीच्या दिवसांमध्ये वडिलांकडून १०० रुपये घेऊन फटाक्यांचे सँपल विकत अाणायचा.धुळ्यात घरोघरी जाऊन ते सँपल दाखवायचे आणि त्यानंतर माल आणून संजीव ते विकायचा.
मित्रांसोबत भागीदारीत असलेल्या या व्यवसायातून त्या काळी ३ ते ४ हजार रुपये मिळत होते. या पैशांतून त्यांनी शिक्षण घेतले. १९८० च्या दशकात ते दहावी उत्तीर्ण झाले. त्या वेळी संगणकाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. १९८९ मध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम धुळ्यात पूर्ण केला. त्यानंतर एम.सी.एस.साठी त्यांनी पुणे विद्यापीठात नाव नोंदवले. पुण्यात शिक्षण, आैरंगाबादेत नोकरी, दर रविवारी धुळ्यात प्रोग्रामरचे क्लासेस, अशी तिहेरी कसरतही केली. सन १९९२ मध्ये एमसीएस झाल्यानंतर त्यांनी प्रख्यात डेल कॉम्प्युटर कंपनीच्या सौदीतील मुख्यालयात नोकरी केली. सन १९९५ मध्ये अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेत जाण्याचा निर्णय आयुष्याला निर्णायक वळण देणारा ठरला.
मुलांना अार्थिक मदत
सन २००१ मध्ये आयटी शास्र नावाची कंपनी सुरू केली. आज दहिवदकर यांच्या अमेरिकेत ४ आणि भारतात ५ कंपन्या आहेत. त्या मुंबई, पुण्यात अाहेत. याशिवाय आशा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत तरुण, होतकरू मुलांना आर्थिक मदत, करिअर मार्गदर्शन केले जाते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

अायुष्यातील टर्निंग पाॅइंट
वाॅलमार्ट या रिटेल उद्योगात प्रोग्रामर म्हणून काम केल्यानंतर संजीव यांनी बँकिंग, घर कर्ज, कायदेविषयक सल्लागार कंपनीत तीन वर्षे काम केले. कर्जासंबंधी साॅफ्टवेअर तयार करणारी कंपनी ‘एमएसटीडी’ स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. तोपर्यंत अमेरिकेतही अशा सेवा कायदेतज्ज्ञ देत होते. मात्र, सॉफ्टवेअर तयार केल्यास सामान्य माणूस हे काम करू शकेल, अशी त्या मागची कल्पना होती. त्यांचा हा होरा अचूक ठरला. म्हाडा, सिडकोप्रमाणे अमेरिकेतील कंपनीनेही हे सॉफ्टवेअर वापरले व दहिवदकरांचे नशीब पालटले.
बातम्या आणखी आहेत...