आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील अतिसंवेदनशील भाग असलेल्या तांबापुरात तब्बल एका तपानंतर सोमवारी अतिक्रमण मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली. कागदोपत्री 60 फुटी रस्त्यावरील दोन्ही बाजूंची सुमारे 400 लहान मोठी अतिक्रमणे जेसीबीने काढून टाकले. विशेष म्हणजे अतिक्रमण काढते वेळी कोणताही गोधंळ होता रहिवाशांनी स्वत:च पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. हरातील अतिक्रमण मोहिमेला एक इतिहास असून साधी टपरी हलवण्यावरून मोठा वाद उफाळला होता. परंतु गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटावला जनतेतूनच प्रतिसाद मिळत आहे. वशेष म्हणजे किरकोळ अपवाद वगळता कारवाई रोखण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याचा फोन अधिका-यांना येत नसल्याचे सांगण्यात आले. हाच अनुभव सोमवारी मनपाच्या अधिका-यांना तांबापुरात आला.
350 मीटर रस्त्यावर मोहीम
अतिशयदा दावाटीचा रस्ता असलेला तांबापुरातील शहीद अ.हमीद चौकापासून ते मेहरूण गावठाणपर्यंतचा सुमारे 350 मीटर अंतरावरील रस्त्यावर ही मोहीम राबवण्यात आली. महापालिकेच्या दप्तरी ६० फूट रस्त्याची नोंद असताना दोन्ही बाजूने ते फुटाचे अतिक्रमण झाले होते. त्यातही वाहनांची पार्किंग यामुळे प्रत्यक्षात रस्ता केवळ २० ते २५ फूटच वापरात होता. सोमवारी सकाळी १० वाजता पालिका पोलिस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. सांयकाळी 5.30 वाजता ही मोहिम पूर्ण झाली. आधीच कल्पना असल्याने रहिवाशांनी तोडफोडीच्या भीतीने बराच सामान हलवला होता. जेसीबीच्या साहाय्याने सोयीसाठी बंदिस्त केलेल्या गटारींवरील ढापे तोडण्यात आले. तसेच घराच्यापुढे रस्त्यावर कॉंक्रीटचे ओटेही तोडण्‍यात आले होते.