आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडकित्त्यांसह प्राचीन वस्तूंचा संग्रह पाडतोय भुरळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
collection of ancient items - Divya Marathi
collection of ancient items
धुळे - जुन्याकाळातील आकर्षक कलाकुसर केलेला नाजूक कुंकवाचा करंडा, पायातील नक्षीदार कडे, अडकित्त्याचे नानाविध प्रकार प्राचीन चलनातील नाणी हा सर्व खजिना येथील वास्तुतज्ज्ञ सुधाकर देवरे यांनी महत्प्रयासाने जतन केला आहे. त्यांच्याकडचा हा खजिना बघितल्यावर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात वावरत आहोत की काय असा भास झाल्याशविाय राहत नाही. देवरे यांनी हा खजिना देशभर भ्रमंती करून जमविला आहे.

शहरातील वाडीभोकर रोड परिसरात राहणारे वास्तुतज्ज्ञ सुधाकर देवरे यांच्याकडे अनेक प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्यात इसवी सन पूर्व वाकटक काळातील नाण्यापासून ते आतापर्यंतच्या नाण्यांसह प्राचीन काळातील रोजच्या वापरातील विविध वस्तूंचा समावेश आहे. प्राचीन वस्तूंच्या रूपाने देवरे यांच्याकडे काळच बंदिस्त झाला आहे. सुधाकर देवरे यांना प्राचीन वस्तू संग्रह करण्याचा नाद त्यांच्या मुलामुळे लागला. त्यांच्या मोठ्या मुलाला लहानपणी एक आन्याचे नाणे सापडले. त्यानंतर त्याच्या समजुतीसाठी सुधाकर देवरे यांनी अजून काही नाणी मिळवली. त्यानंतर त्यांना नाणे संकलित करण्याचा छंद लागला. हा छंद जोपासण्यासाठी त्यांनी काही ठकिाणाहून जुन्या वस्तू घेतल्या.

त्यात प्राचीन मापे, चुना ठेवण्याचा िपतळी डबा, विड्याचे पान ठेवण्यासाठी वापरले जाणारे नक्षीकाम केलेले तांब्या-पितळीचे डबे आदींचा समावेश आहे. सुधाकर देवरे यांची व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठकिाणी नेहमी भटकंती सुरू असायची. भटकंतीदरम्यान त्यांनी त्या-त्या शहरातील भांडे बाजारात जाऊन जुन्या वस्तू जुन्या नाण्यांची खरेदी केली आहे. त्यांच्याकडे साधारणपणे पाचशे वर्षांपूर्वीच्या वस्तू आहेत. त्यात दविे, नाणी, गडू, दागिने ठेवण्याचा डबा, तांब्याच्या अंगठ्या, खेळण्याच्या वस्तू, घंुगरूचे विविध प्रकार, नक्षीदार साखळ्या, मखर यांचा समावेश आहे. या वस्तू त्यांनी नवापूर, धुळे, एरंडोल, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, तंजावर, धामनोद, मांडवगड, उज्जैन, सुरत, बडोदा आदी विविध ठकिाणाहून खरेदी केल्या आहेत. प्राचीन वस्तूंच्या संग्रहामुळे देवरे यांच्या घराला संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वस्तू नागरकिांना पाहता याव्यात, त्यांना इतिहास कळावा यासाठी त्यांचा वस्तुसंग्रहालय उभारण्याचा मानस केला आहे.
एक इच्छा अपूर्ण
जुन्यावस्तू खरेदी करताना सुधाकर देवरे यांनी काही वेळा बाजारभावाप्रमाणे तर काही वेळा जादा पैसे देऊन वस्तू खरेदी केल्या आहेत. एरंडोेल येथे जुना रेकॉर्डप्लेअर वकि्रीसाठी होता. आहे
खरेदीची इच्छा अपूर्ण राहिली असल्याची खंत देवरे यांना आहे.
जुन्या काळातील या वस्तू म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. या वस्तू ठेवण्यासाठी म्हसदी येथे संग्रहालय बांधण्याचा मानस केला आहे. सुधाकरदेवरे, संग्राहक
अडकित्त्यांसह प्राचीन वस्तूंचा संग्रह पाडतोय भुरळ!
बातम्या आणखी आहेत...