आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Meshram News In Marathi, Vice Chancellor, North Maharashtra University

गारपीटग्रस्तांना कुलगुरू मेश्राम यांनी दिले महिन्याचे वेतन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम यांनी गारपीटग्रस्तांना एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. या निर्णयामुळे जवळपास साडेदहा लाखांपर्यंतचा निधी जमा होणार आहे. हा निधी जिल्ह्याधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे.

खान्देशातील गारपीटग्रस्त अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासंदर्भात विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


पुन्हा गारपीट, वादळाचा इशारा
येत्या 24 तासात उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आणखी गारपीट आणि वादळी पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त् राजस्थानच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने इतर ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तासी 4 किलोमीटरपर्यंत असलेला वार्‍याचा वेग 14 ते 15 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तर वार्‍याची दिशा बदलून 117 ते 296 अंशात फिरू शकतो असा अंदाज आहे.