आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Mill In Trouble Due To Government Policy R.R.Patil

सरकारच्या धरसोड धोरणामुळेच साखर कारखानदारी संकटात, आर.आर.पाटील यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा (जि. जळगाव) - साखर व कारखानदारीसंदर्भात देशस्तरावर निश्चित धोरणाचा अभाव व धरसोडीच्या वृत्तीमुळे महाराष्ट्रातील कारखानदारी संकटात सापडली आहे, अशी कबुली गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सोमवारी दिली.
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात 108 सहकारी, तर 60 खासगी साखर कारखान्यांनी मिळून गेल्या हंगामात 700 लाख टन उसाचे गाळप केले होते. सहकारी कारखानदारी मोडीत निघत असून खासगी कारखानदारी वाढत आहे. गेल्या वर्षभरात 27 सहकारी साखर कारखान्यांचे रूपांतर खासगीकरणात झाले. विशेष म्हणजे सहकारात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनीच ते कारखाने विकत घेतली.
राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांची एकूण 20 लाख टन साखर सध्या पडून आहे. महाराष्ट्र साखर उत्पादनाबाबतीत अघाडीवर असला तरी संकटात सापडल्याने अर्थकारणाचे चित्र मात्र पार विसकटले आहे. यात केंद्राच्या धोरणाचा भाग असला तरी साखर कारखान्याच्या निवडणुका जेव्हा येतात तेव्हा संचालक मंडळ कर्ज काढून वाढीव दरांची घोषणा करतात, जास्तीचा भाव देतात, अनावश्यक नोकरभरती करतात. त्यामुळे ही कारखानदारी संस्था कर्जाखाली सापडली आहे.
खरेदी टॅक्स रद्द केला पाहिजे
केंद्र व राज्य सरकारने उसावरील खरेदी टँक्स रद्दच केला पाहिजे अशी आपली भूमिका असून 50 लाख टन साखरचे बफर स्टॉक केंद्र सरकारने केले पाहिजे अशी आपली मागणी आहे जेणे करून स्टॉक साखरेचे पैसे कारखान्यांना मिळतील परिणामी कारखान्यांच्या नफ्यात वाढ होईल. आजारी कारखाने दुरूस्त करण्यासाठी संचालक मंडळाचे व्यवहार पारदर्शक असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.