आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेने पार केली ‘चाळिशी’, उसाचा पेरा घटल्याने दरवाढीचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऐन उन्हाळा लग्नसराईत साखरेच्या भावाने उच्चांक गाठल्याने साखरेचा गोडवा कमी झालेला दिसत आहे. शनिवार बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिकिलोला ४० रुपये, तर क्विंटलला हजार ८५० ते हजार ९०० रुपये हाेते. यंदाच्या हंगामात ऊसगाळप घटल्याने दर वाढले आहेत. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने साखरेचे दर किमान महिने तरी स्थिर राहतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात किरकोळ बाजारपेठेत साखरेचे दर २८ ते ३० रुपये प्रतिकिलाे होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून साखरेचे दर थेट ४० रुपयांपर्यंत जाऊन पाेहाेचले अाहेत. त्यामुळे साखरेच्या वापरावर गृहिणींना निर्बंध आणावे लागत असल्याची स्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीत साखरेचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे.
निर्यातीच्यासक्तीचा परिणाम : साखरेचेदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखरसाठ्यावर मर्यादा घालण्याबाबत सूचना केल्या आहेत. साखरेची साठवणूक करण्यावर मर्यादा घालावी; जेणेकरून दर नियंत्रणात राहतील, अशी सूचना अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केली आहे. सद्य:स्थितीत राज्यात ११७ साखर कारखाने सुरू आहेत. यात अधिक साखर देशांतर्गत बाजारात पाठवली जात आहे. यंदाच्या हंगामात मार्चअखेरपर्यंत कारखान्यांनी दीडशे लाख टन साखर देशांतर्गत बाजारात पाठवली आहे. निर्यातीची सक्ती हे भाववाढीचे कारण असल्याचे बोलले जाते.

साठेबाजीवर मर्यादा : यंदाच्याहंगामात ऊसगाळप घटण्याचा अंदाज असल्याने साखरेचे घाऊक किरकोळ दर वधारले आहेत. जिल्ह्यात केवळ मधुकर साखर कारखाना चोपडा साखर कारखान्यामधून साखरेचे उत्पादन होते. मात्र, चोपडा साखर कारखान्याचे गाळप कमी झाले आहे मधुकर कारखान्याने निश्चित मर्यादेपर्यंतच उत्पादनाचे धोरण ठेवले अाहे. त्यामुळे जिल्ह्याला साखर आयात करावी लागत असल्याचे साखर विक्रेत्यांनी सांगितले.

दरवाढ अटळ
गाळप हंगामात उसाचे उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात वाढ झाली आहे. आता पुढील दसऱ्यापासून सुरू होणाऱ्या हंगामावरच दराचे चित्र अवलंबून असेल. यंदा पेरा कमी असल्याने २५ टक्केच ऊस उत्पादन झाले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साखरेचे दर कमी हाेण्याची शक्यता कमीच आहे. दर कमी झाल्यास ते क्विंटलमागे केवळ दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत होऊ शकतात. आनंद श्रीश्रीमाळ, व्यावसायिक.