आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीअाेचा दालनात विष घेऊन अात्महत्येचा प्रयत्न; चाळीसगावच्या पंचायत समितीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेंटिलेटरवर असलेले बीडीअाे वाघ. - Divya Marathi
व्हेंटिलेटरवर असलेले बीडीअाे वाघ.
चाळीसगाव- चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी (बीडीअाेे) मधुकर काशीनाथ वाघ (वय ५५) यांनी अापल्या कॅबिनमधील  स्वच्छतागृहात विषारी अाैषध सेवन करून अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती सभापतींच्या दालनात मासिक सभा सुरू असतानाच गटविकास अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले. गुरुवारी (दि.२) राेजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. वाघ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले असून त्यांची प्रकृती धाेक्याच्या बाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.  

वाघ अत्यवस्थ अवस्थेत स्वच्छतागृहातून बाहेर पडले. त्यांना उलटी हाेत हाेती. कर्मचाऱ्यांनी अारडाअाेरड करून मदत मागितली. तेव्हा मासिक सभेतून सभापती स्मितल बाेरसे, उपसभापती संजय पाटील तसेच सर्व सदस्य धावले. त्यांनी तातडीने वाघ यांना खासगी रुग्णालयात हलविले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अाले. दाेन तासांच्या उपचारानंतर प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅ. जयवंत देवरे यांनी सांगितले. विष प्राशन करण्यापूर्वी वाघ पंचायत समितीबाहेर पडले. ते एका कर्मचाऱ्यासाेबत दुचाकीवर बसून गेले हाेतेे, असे सांगण्यात अाले. परत अाल्यावर सभापती स्मितल बाेरसे यांच्या दालनात मासिक सभा सुरू हाेेती. याच दरम्यान वाघ यांच्या कॅबिनमध्ये एक-दाेन जण बसले हाेते. ते बाहेर पडल्यावर वाघ  यांनी केबिनमध्येच विष घेतले. 

घटनेला वादाची किनार  
मनरेगा याेजनेंतर्गत असलेल्या विहीर वाटपात झालेला घाेळ तसेच रोजगार हमी योजनेतील कामात अनियमितता केल्याचा ठपका गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यावर ठेवत पंचायत समिती सभापती, उपसभापती तसेच भाजप सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दीड महिन्यापूर्वी तक्रार केली हाेती. वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव पारित करून ताे प्रशासनाकडे पाठवला हाेता. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व या पक्षाच्याच ७ पंचायत समिती सदस्यांनी वाघ यांची पाठराखण करीत सभापती, उपसभापतींच्या भूमिकेला विराेध केला हाेता. मात्र, तक्रारीच्या अाधारे वाघ यांना महिनाभरासाठी बाजूला सारत तेथे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली हाेती. तर मधुकर वाघ यांनीदेखील सभापती, उपसभापतींविषयी प्रशासनाकडे तक्रार करीत चुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचे म्हटले हाेेते. तेव्हापासून वादावादी सुरू हाेती. महिनाभरानंतर मधुकर वाघ तीन दिवसांपूर्वीच पुन्हा कामावर हजर झाले हाेते.  

चिठ्ठीत अामदार, सभापतींचे नाव 
पोलिसांना वाघ यांच्याजवळ पाच पानांची टाइप केलेली चिठ्ठी आढळून आली. ‘अापणास नाहक गाेवण्यात येत असून सक्तीच्या रजेवर पाठवून अापल्यावर अन्याय झाला अाहे. सभापती, उपसभापती यांनी चुकीची व नियमबाह्य कामे करण्यासाठी अापल्यावर दडपण टाकले हाेते. मी कामासाठी काेणाकडूनही पैसे घेतले नसताना अामदार उन्मेष पाटील यांनी फाेन करून याबाबत जाब विचारत शिवीगाळ व मारायची भाषा केली,’ असे वाघ यांनी चिठ्ठीत लिहिले अाहे. माझ्या अात्महत्येस अामदार उन्मेष पाटील यांच्यासह संजीव अभिमन्यू निकम, उपसभापती संजय भास्कर पाटील, सभापती स्मितल दिनेश बाेरसे, त्यांचे पती दिनेश पुरुषाेत्तम बाेरसे, कैलास चिंतामण निकम जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमूद केले अाहे.
 
कारवाईच्या भीतीपाेटी कृत्य
वाघ यांच्याबाबत गंभीर तक्रारी असून त्यांच्या चाैकशीसाठी दाेन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे अधिकारी येथे अाले हाेते. त्यांनी कारवाईच्या भीतीपाेटीच अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अापणासह अामदार उन्मेष पाटील, उपसभापती किंवा अन्य काेणीच त्यांच्यावर दडपण अाणले नाही. 
- स्मितल बाेरसे, सभापती, पंचायत समिती,चाळीसगाव
बातम्या आणखी आहेत...